vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन-१४ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिरात विशेष सांस्कृतिक सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

मुंबईत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन-१४ ऑक्टोबर रोजी रवींद्र नाट्य मंदिरात विशेष सांस्कृतिक सादरीकरण; रसिकांसाठी प्रवेश विनामूल्य

            मुंबई, प्रतिनिधी: ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने साहित्य अकादमी (राष्ट्रीय साहित्य संस्थान), संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘वंदे मातरम्’ हे गीत भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील प्रेरणादायी प्रतीक असून, या गीताने देशवासीयांमध्ये राष्ट्रप्रेम आणि स्वातंत्र्याची भावना जागृत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या गीताच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमातून त्याचा ऐतिहासिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करण्यात येणार आहे.

साहित्य अकादमी ही संस्कृती मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत स्वायत्त साहित्य संस्था असून, साहित्य आणि भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून साहित्य आणि संस्कृती यांचा संगम घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. भारतीय सांस्कृतिक वारसा, साहित्य आणि राष्ट्रप्रेरणेशी निगडित कलाकृतींचा प्रसार करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून, काही जागा राखीव आहेत. मुंबईतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनकल्याणाचा सेतू; ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून शासकीय योजना थेट पोहोचणार घराघरात जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळे आणि शासकीय यंत्रणांना जिल्हा माहिती कार्यालयाचे सक्रिय सहभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय पीक स्पर्धा खरीप हंगाम अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बाजी

ज्येष्ठ नागरिक अत्याचार निर्मूलन व संरक्षण दिन  14 जून रोजी धारावीत ज्येष्ठ साठी विशेष कार्यक्रम

महाराष्ट्रातील ऑलिव्ह रिडले समुद्र कासव संवर्धन कार्यक्रमाला यशस्वी प्रतिसाद

विधानपरिषद साठी भास्कर आबा दानवे यांच्या उमेदवारीची शिफारस करा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवेंना निवेदन

रोजगार व उद्योग क्षेत्राचा व्यापक सर्वेक्षण उपक्रमाच्या घडी पुस्तिकेचेजिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याहस्ते प्रकाशन