vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात संपूर्ण महसुली हद्दीत आकाशात उडणाऱ्या रॉकेट व तत्सम फटाक्यांच्या वापरावर 9 नोव्हेंबर ते 8 जानेवारी या कालावधीत पूर्ण बंदी…

मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात संपूर्ण महसुली हद्दीत आकाशात उडणाऱ्या रॉकेट व तत्सम फटाक्यांच्या वापरावर 9 नोव्हेंबर ते 8 जानेवारी या कालावधीत पूर्ण बंदी…

राज्य प्रतिनिधी-शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, बृहन्मुंबई यांच्याकडून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत रॉकेट व तत्सम आकाशात उडणाऱ्या फटाक्यांचा वापर करण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे.🔷नागरिकांनी नियमांचे आणि निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ठाणे जिल्ह्यात जिल्ह्यात आगामी काळात वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याच्या घटना निदर्शनास आल्या असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे तसेच मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक हवेमध्ये उडणारे रॉकेट व तत्सम फटाके उडवत असून काही नागरिक रॉकेट थेट हातात धरून धोकादायक पद्धतीने उडवत असल्याचे निदर्शनास आले आहे.

     या प्रकारच्या कृत्यामुळे आगीच्या दुर्घटनेमध्ये वाढ होण्याची आणि कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक सुरक्षेची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

      आगीच्या वाढत्या दुर्घटना लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ आपत्कालीन उपाययोजना करणे, रॉकेट व तसम फटाक्यांवर कायदेशीर प्रतिबंध घालणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

      या पार्श्वभूमीवर, रहिवासी भागात, दाट लोकवस्तीच्या ठिकाणी, इमारतीमधील रिफ्यूजी एरिया, वाहनतळ (पार्किंग) किंवा गच्ची (टेरेस) येथून मोठ्या प्रमाणावर रॉकेट, हवेत उडणारे फटाके व तसम फटाके उडविले जात असल्याचे तसेच अशा फटाक्यांमुळे इमारतींना आग लागण्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करणे आवश्यक असल्याबाबत खात्री पटल्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम,२००५ मधील कलमांन्वये पुढील महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

     संपूर्ण ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत रॉकेट व तसम उडवण्याच्या फटाक्यांच्या वापर करण्यावर पूर्ण प्रतिबंध राहील. हे प्रतिबंध सार्वजनिक व खासगी जागा, इमारतींच्या गच्च्या, बाल्कनी, आवारारे आणि सर्व रहिवासी भागात लागू राहील. हा आदेश दि.०९ नोव्हेंबर २०२६ रोजी च्या oo.०१ वाजेपासून ते दि. ०८ जानेवारी २०२७ रोजी च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत पर्यंत लागू राहील.

     संबंधित पोलिस अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व अग्निशमन विभाग यांनी आदेशाची अंमलबजावणी करावी, गृहनिर्माण संस्थांनी आदेशाची माहिती सभासदांना द्यावी, असेही या आदेशात नमूद केले आहे.

    या आदेशाचे पालन करण्यास नकार देणाऱ्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ चे कलम ५१ व ६० मधील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. इतर फटाक्यांचा वापर प्रचालित कायदे, सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश व लागू न्यायालयीन निर्देशांच्या अधीन राहून केला जाऊ शकेल. पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थांनी या आदेशाची तात्काळ व कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

00000000

​

संबंधित पोस्ट

साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*

पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरणी पीडित कुटुंबाची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली भेट आरोपीवर कठोर कारवाईसाठी शासन कटिबद्ध; फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविणार

जेव्हा मुख्यमंत्री एका लहान विद्यार्थिनीचे ‘इंटरव्ह्यूअर’ बनतात…* 

एसआयआर गणनापत्रांसाठी शनिवार, रविवार, सोमवार 3 दिवस ठिकठिकाणी विशेष कॅम्प…

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भविष्यासाठी महाराष्ट्र सज्ज; डेटा सेंटर क्षेत्रात राज्य आघाडीवर – पणन मंत्री जयकुमार रावल

माथाडी कायदा कायम राहणार, वडाळ्यात कामगारांना मिळणार 3 हजार घरे-वाशी मार्केट यार्डच्या जागतिक पुनर्विकासाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घोषणा!

vishwatmaklokswamivarta