vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’अंतर्गत विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा२ डिसेंबर रोजी वाशी येथे ग्रामपंचायतींचा गौरव; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’अंतर्गत विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा२ डिसेंबर रोजी वाशी येथे ग्रामपंचायतींचा गौरव; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) : ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत कोकण विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, अभियानांतर्गत कार्यशाळा तसेच ‘जलसमृद्ध गाव – सरपंच परिसंवाद’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. २ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता सिडको एक्झिबिशन सेंटर, हॉल ‘A’, वाशी (रेल्वे स्थानकाजवळ), नवी मुंबई येथे होणार आहे.

या विभागस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

सन २०२५-२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभागी ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, विभागस्तरीय व राज्यस्तरीय मूल्यांकन करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून, कोकण विभागातील विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींमध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत सिंगापूर, ता. मुरबाड हिने प्रथम क्रमांक, ग्रामपंचायत डोहळे, ता. भिवंडी हिने द्वितीय क्रमांक आणि ग्रामपंचायत फांगुळगव्हान, ता. मुरबाड हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाबाबत मार्गदर्शन, जलसंधारण, जलसुरक्षा व दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींच्या यशोगाथा तसेच सन २०२५-२६ मधील पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर राज्यस्तरीय मान्यवरांचे मार्गदर्शन व ‘जलसमृद्ध गाव – सरपंच परिसंवाद’ होणार आहे.

ग्रामीण विकासामध्ये ग्रामस्थांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. गावातील पाणीपुरवठा, जलसंधारण, स्वच्छता, पर्यावरण, ग्रामविकास आणि विविध लोकाभिमुख उपक्रमांना लोकसहभागाची जोड मिळाल्यास गावाचा विकास अधिक गतिमान होऊ शकतो. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक तसेच संबंधित नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती घ्यावी आणि लोकसहभागातून ग्रामविकासाला बळ द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमास उपस्थित राहून जलसंधारण, जलसुरक्षा आणि ग्रामविकासाच्या विविध संकल्पना समजून घेत त्यांची आपल्या गावात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त कोकण विभाग रुबल अग्रवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.‘दुष्काळावर मात – जलसमृद्ध गाव देईल साथ’ या संकल्पनेला बळ देण्यासाठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा.

०००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

वाढवण बंदर परिसरात जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ उभारणार ! राज्यातील १९० बाजार समित्यांमध्ये ‘शेतकरी भवन’कोपरगाव येथे पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती

विशेष लेख-उष्णतेच्या लाटेत अशी घ्या काळजी

उत्तराखंड, झारखंडच्या संस्कृतीतून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन – राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’च्या भावनेतून विविध राज्यांच्या संस्कृतीचा आदर आणि परस्पर संबंध दृढ करणे आवश्यक

vishwatmaklokswamivarta

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक -सारसबागेची ‘शाहीनबाग’ होऊ देणार नाही; पुण्यात हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक! बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढा; प्रशासकीय अपयशाचा आंदोलकांकडून निषेध*

जिल्ह्यात १० वी व १२ वी परीक्षांसाठी कलम १६३ लागू; परीक्षा केंद्रांभोवती ५० मीटर परिसरात निर्बंध..