vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा व दिग्दर्शक नितेश तिवारींविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार !प्रभु श्रीरामांचा अवमान आणि रावणाचे महिमामंडन केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी…

रामायण’चे निर्माते नमित मल्होत्रा व दिग्दर्शक नितेश तिवारींविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार !प्रभु श्रीरामांचा अवमान आणि रावणाचे महिमामंडन केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी…

     मुंबई प्रतिनिधी: नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘Ramayana: Rise of a Legend’ (‘रामायण’) या चित्रपटात अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली मूळ वाल्मिकी रामायणाचा घोर विपर्यास करून कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावण्यात आल्या आहेत. या गंभीर प्रकाराविरोधात कायदेशीर पाऊल उचलत हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी मुंबईतील मुलुंड (प.) पोलीस ठाणे, मुंबई येथे चित्रपटाचे निर्माते श्री. नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक श्री. नितेश तिवारी यांच्याविरुद्ध अधिकृत पोलीस तक्रार दाखल केली आहे.

  चित्रपटातील गंभीर आक्षेप : रामायण हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून कोट्यवधी हिंदूंच्या श्रद्धेचा आणि जीवनमूल्यांचा आधार आहे. असे असताना या चित्रपटात अत्याचारी रावणाला गरिबांना सोन्याची घरे देणारा, शोषितांचा तारणहार आणि महिलांच्या सन्मानाचा रक्षक म्हणून रंगवून त्याचे अनुचित उदात्तीकरण केले आहे. याउलट, ताडका आणि खर-दूषण यांच्या राक्षसी सेनेसमोर अस्त्रशस्त्रांनी सज्ज असलेले प्रभु श्रीराम व लक्ष्मण घाबरून मागे हटताना व पळ काढताना दाखवले आहेत; तर निशस्त्र रावण एकटाच मोठ्या सेनेसमोर निर्भयपणे लढताना दाखवला आहे.

  शूर्पणखेचे नाक कापल्यावरून माता सीता लक्ष्मणाला “कोणत्याही स्त्रीचे रूप विद्रूप करण्याचा तुला काहीही अधिकार नाही” असे खडसावत असल्याचे आणि प्रभु श्रीराम खर-दूषण राक्षसांची क्षमायाचना करत असल्याचे काल्पनिक व संतापजनक प्रसंग घुसडण्यात आले आहेत. तसेच, त्याग व निष्ठेचे प्रतीक असलेल्या लक्ष्मणाला उद्धट व गुरूजनांचा उपहास करणारे दाखवून पूजनीय व्यक्तिरेखांचे जाणीवपूर्वक अवमूल्यन केले आहे.

 मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम २९९ (जाणीवपूर्वक व दुर्भावनापूर्ण हेतूने धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम १९६ (धर्माच्या आधारावर विविध गटांत वैमनस्य पसरवणे) अन्वये सखोल चौकशी करून गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. निर्माते श्री. नमित मल्होत्रा, दिग्दर्शक श्री. नितेश तिवारी व संबंधित जबाबदार व्यक्तींविरुद्ध बीएनएस कलम २९९ व १९६ अन्वये प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करावी.तपासासाठी चित्रपटाची संपूर्ण अधिकृत प्रत, पटकथा, संवादांची प्रत आणि अधिकृत उपशीर्षके प्राप्त करून प्रत्येक आक्षेपार्ह दृश्याचा अचूक टाइमस्टॅम्प पुराव्यादाखल जतन करावा.

     मूळ ग्रंथ आणि चित्रपटात केलेल्या बदलांची तुलना करण्यासाठी वाल्मिकी रामायणाचे अभ्यासक, संस्कृत तज्ज्ञ आणि धर्मशास्त्राच्या जाणकारांचे मत घेण्यात यावे. कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे आणि पूजनीय पात्रांचे जाणीवपूर्वक अपमानजनक चित्रण हिंदु समाज कदापि सहन करणार नाही. पोलीस प्रशासनाने या तक्रारीची तातडीने दखल घेऊन निष्पक्ष चौकशी व कठोर कारवाई करावी अन्यथा लोकशाही व कायदेशीर मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

. सुनील घनवट राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड, हिंदु जनजागृती समिती.

00000

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-जी विभाग ऐरोली कार्यालयामार्फत अनधिकृत बांधकामावर तोडक मोहिमेचे सुरुवात

सायन पनवेल महामार्गावर सखोल स्वच्छता मोहीमांव्दारे साफसफाई

सहकारी संस्थांनी उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करावेत : प्रवीण दरेकर

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना 📢

नसरापूर प्रकरणी राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात येणार – राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक

महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश