vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृत दुर्गोत्सव २०२६’मध्ये दि.३० पर्यंत सहभागाची संधी

अमृत दुर्गोत्सव २०२६’मध्ये दि.३० पर्यंत सहभागाची संधी..

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात दि.३० पर्यंत सहभागाची संधी असल्याने नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळीच्या काळात लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण उत्साहाने गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करतात. या परंपरेतून कलात्मकतेला वाव मिळण्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, गनिमी काव्याचे युद्धतंत्र, स्वराज्याची संकल्पना आणि दुर्गसंवर्धनाचे महत्त्वही अधोरेखित होते. हा ऐतिहासिक वारसा अधिक व्यापक स्वरूपात जतन करण्याच्या उद्देशाने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे

छायाचित्र अपलोड करून सहभागी व्हा,या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी स्वतः तयार केलेल्या गड-किल्ल्याच्या प्रतिकृतीचे छायाचित्र किंवा प्रतिकृतीसोबतचा सेल्फी काढून www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावा. सहभागासाठी नोंदणीची अंतिम मुदत दि.३०आहे. उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र प्रदान करण्यात येणार आहे

गिनीज बुकमध्ये नोंदीसाठी प्रयत्न,या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांनी साकारलेल्या गड-किल्ल्यांच्या प्रतिकृतींच्या छायाचित्रांची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये नोंद व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा उपक्रम केवळ सांस्कृतिक उत्सव न राहता महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाची जागतिक स्तरावर ओळख निर्माण करण्याची संधी ठरणार आहे.शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, तरुण, पालक, शिक्षक, सामाजिक संस्था, गृहनिर्माण सोसायट्या आणि राज्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. आपल्या कल्पकतेतून गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून महाराष्ट्राच्या शौर्याचे, स्वाभिमानाचे आणि स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. या ऐतिहासिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’च्या माध्यमातून शिवशौर्याचा जागर राज्यभर घडविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

सेवा संकल्प अभियानांतर्गत नवीन जालना मंडळात चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta

ठाणे महापालिकेतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव आरास स्पर्धेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्यात कुठल्याही आस्थापनेत #माथाडीकामगार ची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र असलेल्या कामगारांना रोजगारात प्राधान्य द्यावे,-कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर !राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

vishwatmaklokswamivarta

मनोरा आमदार निवाससाठी ५५.५० कोटींच्या विकास शुल्कासह वाढीव खर्चाला मंजुरी फेब्रुवारी २०२८ पर्यंत भव्य आणि सुसज्ज ४२ मजली इमारत; मिनी थिएटर, जिम आणि आधुनिक सुविधांचा समावेश

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन.