vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

आरोग्यमंत्र्यांनी १०८ रुग्णवाहिकेतून प्रवास करून घेतली सुविधांची प्रत्यक्ष पाहणी रुग्णांना मिळणाऱ्या आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा; रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

आरोग्यमंत्र्यांनी १०८ रुग्णवाहिकेतून प्रवास करून घेतली सुविधांची प्रत्यक्ष पाहणी रुग्णांना मिळणाऱ्या आपत्कालीन सेवांचा घेतला आढावा; रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी साधला संवाद

छत्रपती संभाजीनगर, द प्रतिनिधी) सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी छत्रपती संभाजीनगर आरोग्य संवाद यात्रेदरम्यान १०८ रुग्णवाहिकेतून स्वतः प्रवास करून रुग्णवाहिका सेवेची प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत उपलब्ध होणाऱ्या सुविधा, रुग्णवाहिकेचा प्रतिसाद वेळ आणि वैद्यकीय सेवेची गुणवत्ता जाणून घेण्याच्या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम राबविला.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आमदार प्रशांत बंब, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. कांचन वानेरे, सहाय्यक संचालक हिवताप डॉ. रेखा भंडारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.मंत्री आबिटकर यांनी रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सुविधा, स्ट्रेचर, प्रथमोपचार संच, औषधसाठा तसेच प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून पुरविण्यात येणाऱ्या सेवांची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी स्वतः रुग्णवाहिकेतून लासूर स्टेशन ते गंगापूर असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान रुग्णवाहिका चालक आणि आपत्कालीन वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्याशी संवाद साधून सेवा बजावताना येणाऱ्या अडचणी, रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचविताना उद्भवणाऱ्या समस्या आणि आवश्यक सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी बोलताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, रुग्णासाठी रुग्णवाहिका ही धावती रुग्णालय व्यवस्था आहे. अपघात, हृदयविकार किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. रुग्णवाहिका वेळेत पोहोचणे आणि त्यामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. या सेवांचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यातील त्रुटी व अडचणी जाणून घेण्यासाठी आपण रुग्णवाहिकेतून प्रवास केला. जालना जिल्ह्यातील १०८ व १०२ रुग्णवाहिका सेवा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

विकसित भारतासाठी कौशल्यसंपन्न मानव संसाधनाची निर्मिती हीच काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी सार्वत्रिक व पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर माध्यम प्रतिनिधींसाठी नियमावली जाहीर

जिल्ह्यामध्ये दि.14 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

ग्रामविकास भवनातून ग्रामीण प्रशासनाला मिळणार नवी दिशा – ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे ग्रामविकास भवनाच्या विविध सुविधांची पाहणी

बदलत्या काळाची गरज ओळखून डी. वाय. पाटील समूहाचे आरोग्य क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

अमरावतीच्या वडरपुरा येथील वस्तीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कष्टकरी महिलांसमवेत साजरी केली दिवाळी भाऊबीज-वनजमिनीचे पट्टे महसूल विभागामार्फत कष्टकऱ्यांना मोफत देण्याचा केला निर्धार!

vishwatmaklokswamivarta