vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …       

जिल्हास्तरीय चाचा नेहरु  बाल महोत्सवाला उत्साहात सुरुवात …

 

 जालना, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागा अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय व स्वयंसेवी बालगृहामधील अनाथ, निराश्रीत आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी दि. 19 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये पोलीस मुख्यालयाचे मैदानावर तीन दिवसीय चाचा नेहरू बाल महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सदरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हयाचे अपर पोलीस अधिक्षक मा. श्री आयुष नोपाणी सर, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव बंडकर एन. एम. सर यांचे हस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करून आणि आकाशात तिरंगी व बहुरंगी फुगे सोडून उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी केले. उदघाटन प्रसंगी अपर पोलीस अधिक्षक नोपाणी सर आणि जिल्हा विधीसेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव मा. बंडकर सर बाल कल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत आणि सदस्या विद्या लंके यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

बाल महोत्सव म्हणजे केवळ एक कार्यक्रम नाही तर बालकांच्या सुप्त कला गुणांना वाव देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी उपलब्ध करून दिलेले एक व्यासपिठ आहे. सदरील बाल महोत्सवामध्ये कब्बडी, 100 मी. धावणे, गोळा फेक, थाळी फेक, लिंबु चमचा रेस, पोत्यामधून चालणे इत्यादी मैदानी खेळ आणि कॅरम, बुध्दीबळ, चित्रकला, निबंधस्पर्धा या सारखे इनडोअर गेम तसेच एकल व समुह गायन, एकल व समुह नृत्य, वक्तृत्व स्पर्धा या सारखे सांस्कृतीक कार्यक्रम असे भरघोस कार्यक्रम घेवून तिन दिवस मुलांना त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

मा. अपर पोलीस अधिक्षक श्री नोपाणी सर म्हणालेकी, मुलांनी अभ्यासा सोबतच खुप खेळले पाहिजे खेळ हा फक्त जिंकण्यासाठीच नाही तर खुप मौजमस्ती करण्यासाठी खेळला पाहिजे. तसेच पोलीस विभागा मार्फत सदर कार्यक्रमासाठी पोलीस मैदान तर उपलब्ध करून दिले आहे आणिखी काही आवश्यकता असेल तर ते सांगावी असेही ते म्हणाले. जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव श्री बंडकर सर यांनी ही मुलांना मुलांना खेळ किती महत्वाचा आहे या बाबत मार्गदर्शन केले. तसेच मुलाच्या मैदानी खेळास हिरवा झेंडा दाखवून सुरूवात करून दिली. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरातून लाखो नागरिकांना दिलासा महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध- राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

लातूरला जलसुरक्षित, सक्षम जिल्हा बनविणार -पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण

१ नोव्हेंबरपासून ‘आरोग्य संवाद यात्रा’, आरोग्यमंत्री साधणार थेट जनतेशी संवाद, नांदेड येथून प्रारंभ उपकेंद्रांपासून जिल्हा रुग्णालयांपर्यंत आढावा, १२५ नवीन आरोग्य संस्थांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

राज्याच्या नवीन कौशल्य धोरण मसुद्यावर हरकती व सूचनांचे आवाहन;6 मार्चपर्यंत मुदत

वारंवार नियमभंग करणाऱ्या ऑर्केस्ट्राबार कडक कारवाई करण्याबाबत कायद्यात दुरुस्ती करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

समतेचा जागर वर्षभर सुरू राहणार – डॉ हर्षदीप कांबळे चवदार तळे सत्याग्रह दिन बार्टीने प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे केला साजरा