vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी-विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता…

जिल्ह्यात चार दिवसांसाठी यलो अलर्ट जारी-विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता…

राज्य प्रतिनिधी नांदेड द :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 30 मार्च रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 30 व 31 मार्च 2026 तसेच 1 व 3 एप्रिल 2026 या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे चार दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

या गोष्टी करा :विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: -आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

संबंधित पोस्ट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियानांत ठाणे जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

उच्च शिक्षण विभागातील प्रश्नांना घेऊन मंत्र्यांची भेट आमदार सुधाकर अडबाले यांनी मागण्यांबाबत दिले मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन

जलरक्षण हेच सृष्टीसंरक्षण प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात 1500 हून अधिक तरजालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता.भक्ती ही केवळ शब्दांत नव्हे, तर आचरणातून प्रकट व्हावी-सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज..

येवला व निफाड तालुक्यातील पीक परिस्थितीचा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा निफाड तालुक्यात पडलेल्या पावसाच्या खंडाची फेरपडताळणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी ‘सखी वन स्टॉप सेंटर’ अधिक सक्षम करण्याचे निर्देश – मंत्री आदिती तटकरे