vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाण्यात जिल्हास्तरीय नार्को-को-ऑर्डीनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न;जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश      -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने

ठाण्यात जिल्हास्तरीय नार्को-को-ऑर्डीनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न;जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश      -निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने

ठाणे,दि. प्रतिनिधी

अमली पदार्थांच्या निर्मूलनासाठी आणि त्यावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे जिल्हास्तरीय नार्को-को-ऑर्डीनेशन सेंटर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम आणि प्रतिबंधाबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण करण्यासंदर्भात संबंधित सर्व विभागांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था आणि तरुण वर्गात अमली पदार्थांच्या विरोधात विशेष जनजागृती मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला. अमली पदार्थ तस्करीत आणि सेवनाविरुद्धच्या कारवाया अधिक तीव्र करण्यासाठी पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांनी दिल्या.

वैद्यकीय कारणांशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय प्रतिबंधित औषधांची विक्री होणार नाही, यासाठी औषध निर्माण व प्रशासन विभागाने औषधविक्री केंद्रांची (केमिस्ट) नियमित तपासणी करावी. व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींसाठी समुपदेशन आणि पुनर्वसन केंद्रांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

तरुण पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचवण्यासाठी प्रशासनासोबतच पालकांनी आणि नागरिकांनीही सतर्क राहून सहकार्य करणे गरजेचे आहे, असे आवाहन या बैठकीदरम्यान करण्यात आले.

00000

 

संबंधित पोस्ट

अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक !

राज्याचे नवे राज्यपाल म्हणून जिष्णु देव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन येथे घेतली शपथ

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना विहित मुदतीत गुणवत्तापूर्ण सेवा द्या; प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करा : डॉ. किरण जाधवशासकीय सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्याचे आयुक्तांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राजभवनचे नाव ‘लोकभवन’ करण्यात आल्यानंतर प्रथमच तयार केलेल्या ‘महाराष्ट्र लोकभवन’ दिनदर्शिकेचे प्रकाशन…

समाज परिवर्तनासाठी थोर महापुरुषांच्या जीवनकार्याबाबत संशोधन – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन