vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

पनवेल आरटीओमध्ये दुचाकींसाठी ‘MH46DG’ नवीन मालिका आकर्षक क्रमांकांसाठी 17 फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार..

पनवेल आरटीओमध्ये दुचाकींसाठी ‘MH46DG’ नवीन मालिका आकर्षक क्रमांकांसाठी 17 फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार..

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी):- प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DG ही नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या मालिकेतील आकर्षक व पसंतीचे नोंदणी क्रमांक विहित शुल्क भरून घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांनी दि. 17 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांच्याकडून करण्यात आले आहे.

अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट (DD), निवासी पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र व पॅनकार्डच्या साक्षांकित प्रती खाजगी वाहन विभागात जमा कराव्यात.

एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास त्यांची यादी दि. 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.00 वाजता कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात येईल. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अर्जदारांनी दि. 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपूर्वी इच्छित जास्तीच्या रकमेचा डीडी बंद लिफाफ्यात जमा करणे आवश्यक राहील. त्यानंतर त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (नवीन वाहन नोंदणी विभाग) यांच्या दालनात लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे.

अर्जदारांना सर्वसाधारण सूचना पुढीलप्रमाणे :- डिमांड ड्राफ्ट ‘RTO PANVEL’ यांच्या नावे नॅशनलाइज्ड किंवा शेड्युल्ड बँकेचा असावा व तो दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. अर्जासोबत पॅनकार्ड, ई-आधारकार्ड व पत्त्याचा पुरावा साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. लिलावाकरिता जमा करण्यात येणारा डीडी सिलबंद पाकिटात सादर करावा. विहित शुल्कापेक्षा कमी रकमेचा किंवा दोन महिन्यांपेक्षा जुना डीडी स्वीकारला जाणार नाही. एकदा राखीव ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. राखीव दिनांकापासून 180 दिवसांत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेली फी शासन जमा होईल. आकर्षक क्रमांकासाठी भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत अथवा समायोजित केली जाणार नाही. चालू मालिका पूर्ण झाल्यानंतरच नवीन मालिका सुरू होणार असून, आगाऊ स्वीकारलेल्या अर्जांच्या पावत्या जुन्या मालिकेतील क्रमांक संपल्यानंतरच जारी केल्या जातील. आकर्षक क्रमांकाबाबत अधिक माहितीसाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

0000000

संबंधित पोस्ट

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

vishwatmaklokswamivarta

म्हाडाशी संबंधित विविध गृहनिर्माण सोसायट्यांच्या समस्यांचा उपसभापती सचिन अहिर यांनी घेतला आढावा रहिवाशांचे म्हणणे ऐकून सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध; समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू – राज्यमंत्री योगेश कदम खेड तालुक्यातील जामगे येथे‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत माजी सैनिक मेळावा उत्साहा

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयांच्या विकासाला गती – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

दुष्काळात शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली नको; खासगी सावकारांच्या छळाविरुद्ध कठोर कारवाई करा!-पालकमंत्री जयकुमार रावल पाणी, चारा, रोजगार आणि अन्नधान्यासाठी गावनिहाय नियोजन करा; दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यास सर्वोच्च प्राधान्य

vishwatmaklokswamivarta