vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला..

 राज्य प्रतिनिधी –

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. जींद आणि सोनीपत ही शहरं आता हायड्रोजन रेल्वे🥰t तंत्रज्ञानाच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील, असं पंतप्रधानांनी सांगितलं.

 

🌿 १० डब्यांची, ३,२०० अश्वशक्तीची ही रेल्वे जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन असून, तिच्यातून शून्य कार्बन उत्सर्जन होतं. ही भारताच्या तांत्रिक क्षमतेचं आणि हरित वाहतूक क्षेत्रातील नेतृत्वाचं प्रतीक असल्याचं त्यांनी नमूद केलं.

 

⚡ भारतीय रेल्वेचं जवळपास संपूर्ण विद्युतीकरण झाल्यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षितता अधिक मजबूत झाली असून, जागतिक इंधन पुरवठ्यातील अडचणींचाही रेल्वे सेवांवर परिणाम होणार नाही, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 प्राप्त माहितीनुसार –

🏗️ हरियाणा दौऱ्यात पंतप्रधानांनी ₹१४,७०० कोटींहून अधिक किमतीच्या रस्ते, रेल्वे आणि आरोग्य क्षेत्रातील विकास प्रकल्पांचं उद्घाटन व भूमिपूजन केलं. तसेच प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणच्या लाभार्थ्यांना घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. स्वच्छ भारत अभियानातील हरियाणाच्या योगदानाचं त्यांनी कौतुक करत, जींद ही इतिहास, अभिमान आणि अध्यात्माची भूमी असल्याचं सांगितलं

संबंधित पोस्ट

जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला एमटीडीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांची ‘डेक्कन ओडिसी’ला विशेष भेट महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटन वारशाचा आणि लक्झरी रेल्वे पर्यटनाचा अनुभव घेण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

किल्ले रायगड येथे एनडीआरएफकडून रोप-वे रेस्क्यू मॉक ड्रिल संपन्न

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

केंद्रीय अर्थसंकल्प : युवाकेंद्रित, शेतकरीहितासह सर्वसमावेशक विकासाचा ठोस रोडमॅप – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

vishwatmaklokswamivarta

आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण