vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भूजल पातळी वाढविणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या- वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ पाणीटंचाईवरील उपाययोजनांचे आतापासूनच नियोजन करा; दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालकमंत्र्यांचे प्रशासनाला कठोर निर्देश

भूजल पातळी वाढविणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्या- वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ पाणीटंचाईवरील उपाययोजनांचे आतापासूनच नियोजन करा; दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालकमंत्र्यांचे प्रशासनाला कठोर निर्देश

मुंबई, प्रतिनिधी: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी भूजल पातळी वाढविणाऱ्या जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करून भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता टँकर, पाणीसाठे व उपलब्ध जलस्रोतांचे नियोजन आतापासूनच करावे, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, जलजीवन मिशनची कामे, शेतीची सद्यस्थिती, पीक पंचनामे, जनावरांसाठी चारा व रोजगाराच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

बैठकीस जिल्हाधिकारी मिताली सेठी, दूरदृश्य संवादप्रणालीद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नयन गोयल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कर्वे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन विकास निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या कामांमध्ये जलव्यवस्थापन व जलसंधारणाशी संबंधित कामांना विशेष प्राधान्य द्यावे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सर्व स्तरांवर समन्वयाने प्रयत्न करावेत. शेतकरी आणि मजुरांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून, त्यांना आवश्यक मदत व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने युद्धपातळीवर कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

नंदुरबार जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८६०.४० मि.मी. असून, यंदा आतापर्यंत ४२४.१० मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ४९ टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अक्राणी तालुक्यात ३९.७० टक्के, तळोदा तालुक्यात ४०.६० टक्के आणि नंदुरबार तालुक्यात ४१.४० टक्के पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अवर्षणप्रवण परिस्थिती असलेल्या गावांमध्ये आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिले.

लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचा आढावा घेताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, उष्णतेमुळे नैसर्गिक जलस्रोत आणि भूजल पातळी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे योग्य नियोजन करावे. आवश्यकतेनुसार टँकरची व्यवस्था, तसेच छोटे टँकर खरेदी करण्याबाबत नियोजन करावे. अनधिकृत पाणी उपशावर कठोर निर्बंध घालून उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

खरीप हंगाम २०२६ मध्ये ‘ट्रिगर-१’ लागू झालेल्या तालुक्यांतील परिस्थितीचा आढावा घेताना दुष्काळाचा फटका बसलेल्या पिकांचे पंचनामे प्राधान्याने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुष्काळग्रस्त भागातील पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून देण्याबरोबरच शेतकऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी, असेही निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

दुष्काळी परिस्थितीत जनावरांसाठी पुरेसा चारा व वैरण उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे. तसेच मजुरांचे स्थलांतर होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीनिहाय रोजगाराची कामे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावीत. रोजगार हमी योजनेअंतर्गत भूजल पातळी वाढविणारी जलतारा तसेच जलसंधारणाची कामे, जलसाठे निर्माण करणारी कामे यांना प्राधान्य देऊन अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

००००

संबंधित पोस्ट

ग्रामीण भागातील समीना सय्यदची गगनभरारी; जिल्हा परिषद नाशिक येथे शिक्षिका म्हणून निवड.

vishwatmaklokswamivarta

वरळी जेट्टीच्या नियोजित विकासाला गती; जलवाहतूक आणि हेलिपॅड सुविधांवर भर – मंत्री नितेश राणे मुंबईतील सागरी वाहतूक सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध

जिल्ह्यातील ७२१ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिद्ध आतापर्यंत ११ हजार १४५ शेतकऱ्यांच्या याद्या आधार प्रमाणीकरणासाठी जाहीर; पात्र शेतकऱ्यांना प्रमाणीकरणाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘जेन ओ  पिक्सल ॲण्ड प्ले ॲण्ड ग्लोबल ई-स्पोर्ट गेम्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील मावळ व खेड परिसरात ‘शुभ आरंभ’ उपक्रमातून उल्लेखनीय परिवर्तन…

vishwatmaklokswamivarta

आसाम रायफल्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांशी राज्यपालांचा संवाद