vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य वर्कर्स फेडरेशन विद्युत कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना दसरा निमित्त अकरा टक्के लाभांश वाटप -महाराष्ट्र राज्य वर्कर्स फेडरेशन विद्युत कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना दसरा सणापुर्वी लाभांश वाटप.

महाराष्ट्र राज्य वर्कर्स फेडरेशन विद्युत कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना दसरा निमित्त अकरा टक्के लाभांश वाटप -महाराष्ट्र राज्य वर्कर्स फेडरेशन विद्युत कर्मचारी पतसंस्थेच्या सभासदांना दसरा सणापुर्वी लाभांश वाटप.

जालना प्रतिनिधी:- महाराष्ट्र राज्य वर्कर्स फेडरेशन विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. जालना च्या सभासदांना सन २०२५ २०२६ या वर्षाचा लाभांश वाटप जालना येथे दि.१५/१०/२०२६ रोजी संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.संतोषजी मिसाळ, तसेच प्रमुख अतिथि वर्कर्स फेडरेशनचे केंद्रीय सल्लागार कॉ.पी.एम. कुलकर्णी, जेष्ठ नेते कॉ. जे. सी. डोळसे व झोनल अध्यक्ष कॉ. आर. डी. पुंगळे, मा. केंद्रीयका सदस्य को आर. बी. आढाव, पतसंस्थेचे सचिव श्री. संदीप केरळ, संचालक श्री अमर डांगे, श्री. गणेश जी चिरखो, श्री. डी. एस. पोपळघट, श्री. रामेश्वर पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला. त्याच बरोबर आज भोकरदन, जाफ्राबाद, बदनापुर, परतुर, मंठा, अंबड, घनसावंगी, येथेही संस्थेच्या सभासदांना लाभांशचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल व पुष्पहार देउन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवर यांनी सांगितले की, ही पतसंस्था वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्याखाली कार्यरत असुन एक आदर्श अग्रगण्य पतसंस्था म्हणुन नावारूपास आलेली आहे. सभासदांचे हित जोपासणारी ही पतसंस्था असुन या पतसंस्थेत सामाजिक उपक्रम रामविण्यात येतात. संस्थेची प्रगतीकडे यशस्वीपणे वाटचाल सुरू असून, संस्थेचे अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ अभिनंदनास पात्र आहे. यावेळी पतसंस्थेचे संचालक व सभासद श्री. गणेश चिरखे, अमर डांगे, डी. एस. पोपळघट, आर.ए. पवार, एम.ए. नगरे, अनिल जैस्वाल, अशोक जईद, पांढरे, आढाव, एन.जे. पवार, एस.पी. डोळसे, साळवे, राम सपकाळ, संजय राठोड, बोने, मांडवे, श्रीमती.एन.एल.पगवाड, बोर्डे, शिंदे, कावळे, लांडगे, खरात, अदीसह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.

ऐन दसरा सणापूर्वी लाभांश मिळल्यामुळे सभासदामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तरी सर्व सभासदांनी आपले लामांचे चेक संस्थेच्या कार्यालयात येऊन मेउन जावे असे आवाहन संस्थेचे सचिव श्री. संदीप केरकळ यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जालना जिल्ह्यासाठी 8 हजार 515 कोटींच्या वार्षिक पत आराखड्याचे प्रकाशन• पीक कर्ज, कृषी व एमएसएमई क्षेत्राला प्राधान्य• वार्षिक पत आराखड्यात बँकांची 101 टक्के उद्दिष्टपूर्ती

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ प्रभावी आणि व्यापक स्वरूपात राबविण्यात यावे – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

चांदूर रेल्वे उपविभागात शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची मोहीम सुरू; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

यूएई आणि भारतामधील बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांचा दूरदृष्य संवाद प्रणालीद्वारे सहभाग