vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईतील माहीममधील ज्वेलर्स दुकानाबाहेर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी झाडल्या २ गोळ्या; दुकानदार सुरक्षित!

आज मुंबईतील माहीममधील ज्वेलर्स दुकानाबाहेर गोळीबार! दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी झाडल्या २ गोळ्या; दुकानदार सुरक्षित!

राज्य प्रतिनिधी- आज पुण्यातील न्यायालयाच्या आवारात गोळीबार जामिनावर सुटलेल्या आरोपीवर आणि कोयत्याने हल्ला झाला तर मुंबई

माहीम परिसरातील एल. जे. रोडवरील जागृती सोसायटीजवळील शॉप हॉटेल जंक्शन येथे असलेल्या पी. सी. जैन ज्वेलर्स दुकानाबाहेर बुधवारी सायंकाळी ७:३५ वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली.

हेल्मेट घातलेल्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुकानाबाहेरून दोन गोळ्या झाडल्या आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत दुकानाचे मालक भरत जैन आणि दुकानातील कर्मचारी सुरक्षित असल्याची माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विक्रम देशमाने, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त महेंद्र पंडित आणि माहीम पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळी तपासणी केली.या गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास केला जात आहे.

संबंधित पोस्ट

नातेवाईकांपासून दूर असलेल्या बंद्यांसाठी कारागृहात रक्षाबंधन

vishwatmaklokswamivarta

यशकथा-बँक सखी ते लखपती दीदींची आधारस्तंभ: कावेरी जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास

परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांचा दौरा 

मेट्रो मार्गिका-५ अ, टप्पा एक आणि टप्पा दोनला मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रालयात मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा विकास समितीची बैठक

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

…अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती 

vishwatmaklokswamivarta