vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मौजे पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सुसज्ज कार्यालयामुळे महसुली सेवा अधिक सुलभ होणार

मौजे पिकुळे येथे ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लोकार्पण सुसज्ज कार्यालयामुळे महसुली सेवा अधिक सुलभ होणार

सिंधुदुर्ग, प्रतिनिधी: दोडामार्ग तालुक्यातील मौजे पिकुळे येथे महाराष्ट्र शासन, जिल्हा नियोजन समिती आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या नूतन ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाचे (तलाठी कार्यालय) लोकार्पण राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यालयामुळे पिकुळे येथील नागरिकांना महसुली कामकाजासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध झाली आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना सातबारा उतारा, विविध दाखले तसेच अन्य महसुली सेवांसाठी अधिक सुलभतेने संपर्क साधता येणार असून, स्थानिक पातळीवर प्रशासकीय सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या लोकार्पण सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, दोडामार्ग पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी वीरसिंग वसावे, पशुसंवर्धन उपयुक्त समीर बिलोलीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता पूजा इंगवले यांच्यासह दोडामार्गचे तहसीलदार राहुल गुरव, भेडशीचे मंडळ अधिकारी सचिन गोरे, पिकुळे ग्रामपंचायतीचे सरपंच आपा वसंत गवस, सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी सीमा गोवेकर आणि ग्राम महसूल अधिकारी स्मिता परब उपस्थित होते. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन कार्यालयामुळे गावातील महसुली कामकाज अधिक सुलभ होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

0000

संबंधित पोस्ट

मच्छिमार कामगारांच्या सामाजिक, आर्थिक सुरक्षेला प्राधान्य – मंत्री नितेश राणे

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण करून १ मे रोजी लोकार्पणासाठी सज्ज करूया – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शेंडा पार्कमध्ये सीपीआरसह शासकीय महाविद्यालय व विविध संस्थांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना ॲड . निलेश हेलोंढे पाटील यांची सांत्वन भेट…

मतदारयादी अद्ययावत आणि अचूक तयार करावी – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसमवेत बैठक

vishwatmaklokswamivarta

घरगुती गॅसचा पुरवठा नियमित, नागरिकांनी घाबरून जाऊ नये- जिल्हाधिकारी किशन जावळे*​दोन सिलिंडर बुकिंगमध्ये २५ दिवसांचे अंतर अनिवार्य; जिल्हा प्रशासनाचे स्पष्टीकरण,घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कारवाईचा इशारा*

भटक्या कुत्र्यांसाठी डॉग पॉन्ड, शेल्टर उभारण्यास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पावणेपाच कोटीचा निधी केला मंजूर– महानगरपालिका व 10 नगरपालिका /नगरपंचायत कार्यक्षेत्रात श्वान निवारा केंद्र उभारण्यात येणार