vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट

मुंबई, प्रतिनिधी : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी शिवाजी पार्क येथे आयोजित बंगाल क्लबच्या दुर्गापूजा उत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी देवी दुर्गेची पूजा करून दर्शन घेतले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते बंगाल क्लबच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, बंगाल क्लबच्यावतीने आयोजित दुर्गापूजा हा सर्वांना एकत्र आणणारा, सामाजिक एकोपा आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा उत्सव आहे. समाजाची खरी ताकद ही आर्थिक संपत्तीपेक्षा संस्कृती आणि एकजुटीत आहे.

समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करावे आणि परस्परांमध्ये एकोपा कायम राहावा, अशी आपण सर्वांनी मिळून देवीकडे प्रार्थना करूया, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी बंगाल क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

 

संबंधित पोस्ट

बोगस बियाणे- कीटकनाशक कंपन्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नवीन कायदा आणणार – केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी ३६७ कोटींचा निधी वितरित

एमएसपी’अंतर्गत खरेदी केलेल्या धान व भरडधान्याची प्रलंबित देयके तातडीने अदा करा – मंत्री छगन भुजबळ

एस टी महामंडळाची NCMC स्मार्ट कार्ड सेवा-सवलतधारी प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती

दुष्काळी परिस्थितीत पशुधनाला दर्जेदार आणि सुरक्षित चारा मिळणार- पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती- मंत्रिमंडळ उपसमितीच्या अभ्यासगटाच्या बैठकीत चाऱ्याचे दर निश्चित ; पशुपालकांना दिलासा- दुष्काळ जाहीर कालावधीत सुधारित आधारभूत दर लागू ; सुका चारा प्रतिकिलो कमाल १२ रुपये; मुरघासासाठी कमाल ८ रुपये

vishwatmaklokswamivarta

कनेक्टिंग लिंकच्या एंट्री पॉईंटजवळ दरड कोसळलेल्या घटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली प्रत्यक्ष पाहणी

जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta