vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

राज्यात पेट्रोल आणि डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

राज्य प्रतिनिधी-

राज्यात #पेट्रोल आणि #डिझेल चा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची #इंधनटंचाई नसल्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. मात्र काही भागांत अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याने पेट्रोल-डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये, असे आवाहन मंत्री श्री. भुजबळ यांनी पेट्रोल-डिझेल वितरणासंदर्भातील आढावा बैठकीत केले.

यावेळी एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या उपलब्धता व वितरण व्यवस्थेचाही आढावा घेण्यात आला. नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बैठकीस अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, राज्य शिधावाटप नियंत्रक चंद्रकांत डांगे तसेच विविध तेल कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित करण्यात आले आहे

vishwatmaklokswamivarta

दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती कार्यशाळा

राज्यातील प्रस्तावित सहकार भवनची कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

vishwatmaklokswamivarta

पनीरच्या नावाखाली ॲनालॉगचा वापर- आढळल्यास आता थेट कारवाई

किसान सन्मान निधी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित मुंबई येथून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी