vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचेवीज बिल शून्यावर आणणार- पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडेपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सौरऊर्जा प्रकल्पासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाचा ‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करार,पशुसंवर्धन विभागाच्या जागांवर प्रायोगिक सौरऊर्जा प्रकल्पआयुक्त कार्यालयातील इमारतींची छते आणि साकूड येथील प्रक्षेत्राचा पहिल्या टप्प्यात समावेश..

सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाचेवीज बिल शून्यावर आणणार- पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडेपशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सौरऊर्जा प्रकल्पासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाचा ‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करार,पशुसंवर्धन विभागाच्या जागांवर प्रायोगिक सौरऊर्जा प्रकल्पआयुक्त कार्यालयातील इमारतींची छते आणि साकूड येथील प्रक्षेत्राचा पहिल्या टप्प्यात समावेश..

मुंबई, प्रतिनिधी: सौर ऊर्जेचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पशुसंवर्धन आयुक्तांच्या अधिपत्याखालील कार्यालये व प्रक्षेत्रांतील उपलब्ध जागेत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ‘महाप्रीत’सोबत सामंजस्य करार करण्यात आला.

पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील, महाप्रीतचे संचालक दीपक कोकाटे यांनी स्वाक्षरी केल्या. पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी आदी उपस्थित होते

यावेळी पशुसंवर्धन मंत्री मुंडे म्हणाल्या की, सौर ऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यात पशुसंवर्धन विभागातील सर्व इमारतींचे वीज बिल शून्यावर आणून अतिरिक्त वीज निर्मिती करून त्या विक्रीतून विभागाचे उत्पन्न वाढवण्यासाठी हा सामंजस्य करार महत्वाचा ठरणार आहे

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची उपकंपनी महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेडने (महाप्रीत) पशुसंवर्धन विभागाच्या जागांवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यास स्वारस्य दर्शविले आहे. कंपनीने पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या समोर याबाबत सादरीकरण केले.

विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी इमारतींच्या छतांवरील जागेची उपलब्धता, प्रक्षेत्रांचे स्थळ सर्वेक्षण आणि व्यवहार्यता अभ्यास केला जाणार आहे. विस्तृत प्रकल्प अहवाल सादर झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय परिसरातील कार्यालयीन इमारतींच्या छतांवर तसेच साकूड, (ता. अंबेजोगाई, जि. बीड) येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाच्या अधिपत्याखालील प्रक्षेत्रावर प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 

०००००

संबंधित पोस्ट

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘कर्मचारी समाधान शिबिराचे’ आयोजन कर्मचारी समाधान शिबिरासाठी माहिती तात्काळ सादर करा -जिल्हाधिकारी 

पुण्यातील नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी विशेष प्रयत्न; कुटुंबाचे संरक्षण व पुनर्वसन करणे ही सरकारची बांधिलकी– उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे“आईच्या हंबरड्याने मन हेलावलं… चिमुकलीच्या न्यायासाठी लढा थांबणार नाही”महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी फास्टट्रॅक न्यायालये वाढवण्याची गरज अधोरेखित; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

दिल्लीतमहिलासाहित्यसंमेलन ; डॉ. शारदा चोंडेकरांच्या प्रतिभेची दखल ..

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालखी महामार्गाची पाहणी

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त सांगलीत कौशल्य, रोजगार व उद्योजकतेचा प्रेरणादायी सोहळा

जालन्यातील लक्कडकोट येथील जमीन वादाने पेटले रान; जयश्री कटके यांच्याकडून पोलीस व राजकारण्यांवर गंभीर आरोप