vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

हिंद-दी-चादर” कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्तांनी कार्यक्रमस्थळी केली पाहणी…

 

     नवी मुंबई, प्रतिनिधी:-“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम दि. 28 व 01 मार्च रोजी खारघर नवी मुंबई येथील ओवे मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी देश आणि राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर भाविक येणार असल्याने, त्यांच्या सोयी-सुविधांच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कामांची अंतिम टप्प्यातील पाहणी आणि आढावा आज कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन घेतला.

  यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, ठाणे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, अपर आयुक्त फरोग मुकादम, सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) विजयकुमार म्हसाळ, सहआयुक्त (करमणूक) रविंद्र पवार, रायगड उपजिल्हाधिकारी व नवी मुंबई समागम समन्वय अधिकारी रविंद्र राठोड, प्रभारी माहिती उपसंचालक मनोज सानप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी मैदानाची सज्जता, प्रवेश व निर्गमन मार्ग, वाहनतळ व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा व आपत्कालीन व्यवस्थापन,लंगर व्यवस्था, मुख्य मंडप आदी बाबींच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हिंद दी चादर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध कामांसाठी संबंधित विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. त्या समित्यांनी केलेल्या कामाचा आढावा त्यांनी घेतला

    यावेळी पनवेल महानगपालिकेने या समागम कार्यक्रमासाठी देश व राज्य भरातून येणाऱ्या भाविकांना वाहनतळ आणि निवास व्यवस्थेविषयी सुलभतेने माहिती मिळावी, या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या हिंद दी चादर मोबाईल ॲप बद्दल माहिती देण्यात आली. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने व काटेकोरपणे काम वेळेत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

0000

संबंधित पोस्ट

आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! ५५०० बसेसद्वारे ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांचा सुखरूप, सुरक्षित प्रवास – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

डॉ. चित्तरंजन पुरंदरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान प्रेरणादायी – मंत्री छगन भुजबळ प्रा. डॉ. पुरंदरे यांचा गौरव सोहळा व ‘हँड्स दॅट हील्ड, अ हार्ट दॅट लेड’ आत्मचरित्राचे प्रकाशन

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीला गती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक

vishwatmaklokswamivarta

राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान ‘गणेशोत्सव २०२६ शास्त्रीय संगीत महोत्सव’

vishwatmaklokswamivarta

विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करा – मंत्री चंद्रकांतदादा पाटील १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठांमध्ये एकदिवसीय संमेलने

vishwatmaklokswamivarta

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍