vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्याप्रदेश

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न हिंद दी चादर कार्यक्रमाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत गौरवशाली इतिहास पोहचणार

 

नांदेड, प्रतिनिधी:“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित उपक्रमाचा ‘आरंभता की अरदास’ हा विधी आज नांदेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी मुख्य कार्यक्रमाच्या मंडपाचे भूमीपूजन तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वाराचे पंचप्यारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सिख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि, भगत नामदेव संप्रदाय व उदासीन संप्रदाय या समाजातील संतांची उपस्थिती लाभली.हिंद-दी-चादर कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर, नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी विधान परिषदेचे सदस्य बाबुसिंग महाराज( पोहरादेवी), जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार संजय वारकड, ३५० वा शहीदी समागम समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, क्षेत्रीय समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, क्षेत्रीय समितीचे पदाधिकारी, राज्यस्तरीय समितीचे सदस्य उपस्थित होते.

समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, नांदेड येथे २४ व २५ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहादतीचा गौरवशाली इतिहास समाजासमोर मांडण्यात येणार आहे. अल्पसंख्यांक विकास विभाग आणि नऊ समाजांच्या संयुक्त सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत असून, यापूर्वी ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे हा कार्यक्रम भव्य स्वरूपात संपन्न झाला आहे. त्याच धर्तीवर नांदेडमध्येही हा ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.कार्यक्रमानंतरही श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांचा इतिहास जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंग यांनी राज्यात नागपूर येथे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून नांदेड व नवी मुंबई येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याबद्दल शासनाचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात येणार असून गौरवशाली इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, रविवार दि. २५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन व पूर्वतयारीला गती देण्यात आली आहे. सुरक्षा, वाहतूक व कार्यक्रमस्थळ व्यवस्थापनाबाबत सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून यासंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात क्षेत्रीय धर्मजागरण समितीचे प्रमुख महेंद्रजी रायचुरा यांच्या उपस्थितीत अशासकीय व शासकीय सदस्यांच्या सोपविलेल्या कामाचा आढावा घेतला

संबंधित पोस्ट

आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत धारणी व चिखलदरा तालुक्यांचाडेल्टा रँकिंगमध्ये राष्ट्रीय-राज्य पातळीवर गौरव राज्यात पटकाविला अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक 

🎓📚 भामरागड प्रकल्पातील 26 विद्यार्थ्यांची निट-जेईई विशेष प्रशिक्षणासाठी निवड आदिवासी विकास विभागाचा पुढाकार; फिझिक्सवाला मार्फत दोन वर्षांचे मोफत निवासी प्रशिक्षण.. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणाची नवी संधी…

ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या छायाचित्र प्रदर्शनाची भव्य सांगता मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर यांची उपस्थिती

शहापूर व धाकलगाव येथे जलद एस.टी. बसेसना अधिकृत थांबा द्या ; एस.टी.महामंडळाकडे प्रवाशांची मागणी-विद्यार्थी,महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय ; खासगी वाहतुकीमुळे आर्थिक भुर्दंड

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर-बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा घेतला आढावा; शेतकऱ्यांना दिली मदतीची हमी..जिल्ह्यातील कोलारी, खडकी खामखेड, रोहिणखेड, टाकळी येथे केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

वैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री अतुल सावेवैश्विक ओळखपत्र काढण्यासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ – मंत्री अतुल सावे