vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

सेवा संकल्प अभियानांतर्गत ऐरोलीतील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सत्र उत्साहात संपन्न

सेवा संकल्प अभियानांतर्गत ऐरोलीतील दत्ता मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयात करिअर कौन्सिलिंग सत्र उत्साहात संपन्न

     नवी दिल्ली प्रतिनिधी-     नवी मुंबई महानगरपालिका, जी विभाग, ऐरोली यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत करिअर कौन्सिलिंग सत्राचे आयोजन ऐरोलीतील दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमास २५० हून अधिक विद्यार्थी, महाविद्यालयाचे प्राध्यापक तसेच नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभागातील अधिकारी उपस्थित होते.

          नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ‘लाईफ इज मॅरेथॉन’ या विचारातून विद्यार्थ्यांना सातत्य, आरोग्य व कौशल्य विकासाचे महत्त्व सांगितले. “Time is with you, Health is real wealth” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच आरोग्य आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी केले. नवी मुंबईतील Global Capability Centres, R&D, Data Centres, Digital Twin, GIS व AI आधारित तंत्रज्ञान आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना महत्वाची माहिती दिली.

          महापालिकेच्या प्रस्तावित करिअर अकॅडमी, स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध होणाऱ्या संधी तसेच State-of-the-Art Diploma Courses याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. तृतीय व अंतिम वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध सार्वजनिक कामांमध्ये — जसे की स्थापत्य, पाणीपुरवठा, यांत्रिकी व इतर विभागांमध्ये—प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी सहभागी करून घेण्याच्या संकल्पनेवर त्यांनी विशेष भर दिला.

          कार्यक्रमातील प्रश्नोत्तर सत्र विशेष उत्साहपूर्ण ठरले. यामध्ये आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अत्यंत सहज, संवादात्मक आणि हसत-खेळत उत्तरे देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. यामुळे विद्यार्थ्यांचा कार्यक्रमातील सहभाग अधिक उत्स्फूर्त झाला.

          परिमंडळ 2 चे उपायुक्त श्री. संजय शिंदे यांनी स्पर्धा परीक्षांच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करताना ध्येय कसे निश्चित करावे, त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न व नियोजन कसे करावे आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश कसे संपादन करता येते, याबाबत स्वतःच्या अनुभवातून अनेक प्रेरणादायी गोष्टी विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. त्यांच्या अनुभव कथनातून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळाला.

          ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विशाल शितोळे यांनी करिअर कौन्सिलिंगवर सादरीकरण करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा, योग्य करिअर आणि उज्ज्वल भविष्य याबाबत मार्गदर्शन केले. शॉर्ट टर्म व लाँग टर्म गोल निश्चित करून त्यांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, तसेच स्वतःच्या अनुभवातून मिळालेले विविध धडे त्यांनी विद्यार्थ्यांसोबत शेअर केले.

          याप्रसंगी जी प्रभाग समिती अध्यक्ष श्रीम.हेमांगी सोनावणे उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सावरकर यांनी प्रास्ताविकातून या कार्यक्रमाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी अशा या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी ऐरोली विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. विशाल शितोळे व कनिष्ठ अभियंता श्री. जयदीप माटे यांचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचे मार्गदर्शनपर उपक्रम सातत्याने आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

संबंधित पोस्ट

क्वांटम संगणन तंत्रज्ञानामुळे सायबर सुरक्षेसमोर नवे आव्हान– आयबीएमचे संशोधन संचालक अमित सिंघी

डिजिटल युगात ‘सायबर प्रतिकारशक्ती’ काळाची गरज – राज्य महिला आयोगाच्या बैठकीत विचारमंथन कोल्हापुरात राज्य महिला आयोगाची सायबर सुरक्षा, बीएनएस कायदे या विषयावर विशेष बैठक

1एप्रिल २०२६ पासून आयकर विभाग सामान्य नागरिकांच्या सोशल मीडिया, व्हॉट्सॲप चॅट्स आणि दैनंदिन खर्चावर नियमितपणे पाळत ठेवणार असल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

vishwatmaklokswamivarta

उमेद मार्ट उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’

डिजिटल पद्धतीने होणार जनगणना – २०२७ : प्रक्रिया होणार दोन टप्प्यांत पूर्ण-जिल्ह्यात ३० चार्ज अधिकारी व हजारो प्रगणकांची नियुक्ती विविध ठिकाणी प्रशिक्षणास सुरुवात

टेक-वारी २.०’ प्रशिक्षण उपक्रमांतर्गत ‘डिजिटल युगातील डेटा सुरक्षेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन