vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञान

गोवा विमानतळावर परीक्षा गैरव्यवहारासाठी वापरली जाणारी ब्लूटूथ साधने बाळगलेल्या दोन विमान प्रवाशांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने घेतले ताब्यात जप्त केलेल्या उपकरणांचा संबंध भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती परीक्षेशी असल्याचेही झाले उघड, या प्रकरणी गुन्हाही दाखल

गोवा विमानतळावर परीक्षा गैरव्यवहारासाठी वापरली जाणारी ब्लूटूथ साधने बाळगलेल्या दोन विमान प्रवाशांना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने घेतले ताब्यात


जप्त केलेल्या उपकरणांचा संबंध भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती परीक्षेशी असल्याचेही झाले उघड, या प्रकरणी गुन्हाही दाखल

राज्य प्रतिनिधी गोवा-

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी 10 ऑक्टोबर 2026 रोजी गोव्यात दाबोलीम इथल्या गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या कारवाईत, स्पर्धा परीक्षांमध्ये गैरव्यवहार करण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलेली ब्लूटूथ साधने बाळगलेल्या दोन देशांतर्गत प्रवाशांना ताब्यात घेतले. दोन्ही प्रवाशांना जप्त केलेल्या साहित्यासह स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

10 ऑक्टोबर 2026 रोजी सुमारे 14 वाजून 25 मिनीटांनी (दुपारी 2 वाजून 25 मी. ), एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1340 या विमानाने गोव्याहून दिल्लीला जाण्यासाठी निघालेल्या पहिल्या प्रवाशाने उड्डाण पूर्व सुरक्षा तपासणी केंद्रावर त्याची हँडबॅग एक्स रे स्क्रिनिंगसाठी ठेवली होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्याला एक्स रे प्रतिमेत संशयास्पद वस्तू आढळल्याने त्याने बॅग प्रत्यक्ष तपासणीसाठी पाठवली. या तपासणी दरम्यान स्पर्धा परीक्षांमध्ये कॉपी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तीन इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन सिम कार्ड आणि तीन ब्लूटूथ इअरपीस हस्तगत करण्यात आले.

गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात केंद्रीय असलेल्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशाकडे विचारपूस केली असता, ही उपकरणे परीक्षेत गैरव्यवहारासाठीच असल्याचे पहिल्या प्रवाशाने मान्य केले. तसेच आपल्यासोबत प्रवास करणारा सहकारी आधीच विमानात बसल्याची माहिती त्याने दिली. विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी दुसऱ्या प्रवाशाला विमानातून खाली उतरवले. त्याच्या हँडबॅगच्या झडतीदरम्यान तशाच प्रकारचे एक साधन, दोन ब्लूटूथ इअरपीस, एक सिम कार्ड आणि त्याच दिवशी पार पडलेल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या गोवा इथल्या संकुलाच्या बिगर शिक्षक भरती परीक्षेसाठीच्या, प्रशासकीय सहाय्यक पदाचे प्रवेशपत्रही जप्त करण्यात आले. हे उपकरण त्या परीक्षेत वापरण्यासाठीच होते, अशी कबुली त्या दुसऱ्या प्रवाशानेही दिली.

त्यानंतर संबंधित गुप्तचर यंत्रणांसोबत दोन्ही प्रवाशांची संयुक्तपणे चौकशी करण्यात आली. पहिल्या प्रवाशाने, तो इतर दुसऱ्याच उमेदवाराच्या ऐवजी या परीक्षेला बसला असल्याची कबुली दिली. या प्रवाशाने सुरक्षा क्षेत्रात त्याने फेकून दिलेले इतर दोन व्यक्तींचे आधार कार्डही यानंतर जप्त करण्यात आले. हा प्रवासी संरक्षण आस्थापनातील नागरी कर्मचारी असल्याच्या दावा त्याने केला होता, त्याच्या या दाव्याचीही संबंधित प्राधिकरणांकडून पडताळणी करण्यात आली.

दोन्ही प्रवाशांसह, जप्त केलेली सर्व उपकरणे आणि कागदपत्रे दाबोलीम विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. संबंधित परीक्षा केंद्र हे फोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, नंतर त्यांना तिथे हस्तांतरित करण्यात आले. दोन्ही प्रवाशांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीस पुढील तपास करत आहेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल देशभरातील विमानतळांवर विमान वाहतूक विषयक सुरक्षा पुरवते. या प्रकरणात, तपासणी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे या उपकरणांचा शोध लागला आणि परीक्षा गैरव्यवहाराशी संबंधित साहित्यासह राज्य सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन प्रवाशांना रोखण्यात यश आले.

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राष्ट्रीय सन्मान हा प्रत्येक देशभक्ताची भावना त्यांना भारतरत्न ने सन्मानित करण्याबाबतचा शासकीय ठराव पावसाळी अधिवेशनात पारित करावाआमदार सुधीर मुनगंटीवार यांची राज्य शासनाकडे मागणी

महाशिवरात्रीनिमित्त देशभरातल्या शिव मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

संत एकनाथ महाराज पालखी सोहळा:-वारकऱ्यांसाठी सर्व विभागाकडून सुविधांची सज्जता- अपर जिल्हाधिकारी डॉ.संभाजी अडकूणे

नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात आज भेट

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया..

पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य; उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करा-ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून शेतीसाठी उर्वरित पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश**शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे*अधिकाऱ्यांनी अधिक संवेदनशील पणे काम करण्याचे निर्देश*

vishwatmaklokswamivarta