vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

आप’च्या काही नेत्यांनी त्यांना एक लाजिरवाणी सल्ला दिला “जा आणि गुरुद्वारामध्ये घुसा” मग काय, हे सर्वजण बंगाला साहिब आणि रकाबगंज गुरुद्वारात बळजबरीने घुसले.-आंदोलनाची नौटंकी करण्यात आली होती. या आंदोलनात नेहमीप्रमाणे गदारोळ झालाच, पण एक अशी घटना घडली जिने सर्व शीख बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे.- गुरुद्वारा व्यवस्थापक

आप’च्या काही नेत्यांनी त्यांना एक लाजिरवाणी सल्ला दिला “जा आणि गुरुद्वारामध्ये घुसा” मग काय, हे सर्वजण बंगाला साहिब आणि रकाबगंज गुरुद्वारात बळजबरीने घुसले.-आंदोलनाची नौटंकी करण्यात आली होती. या आंदोलनात नेहमीप्रमाणे गदारोळ झालाच, पण एक अशी घटना घडली जिने सर्व शीख बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे.- गुरुद्वारा व्यवस्थापक

नवी दिल्ली प्रतिनिधी

 दिल्लीमध्ये ‘आम आदमी पार्टी’ (AAP) आणि त्यांच्याच इशाऱ्यावर नाचणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (जी आपचीच बी-टीम म्हणून काम करते) यांच्या वतीने एका आंदोलनाची नौटंकी करण्यात आली होती. या आंदोलनात नेहमीप्रमाणे गदारोळ झालाच, पण एक अशी घटना घडली जिने सर्व शीख बांधवांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे.

जंतरमंतरवर पोहोचण्यात अपयशी ठरलेले हे कॉकरोच इकडेतिकडे सैरभैर फिरत होते. अशातच ‘आप’च्या काही नेत्यांनी त्यांना एक लाजिरवाणी सल्ला दिला “जा आणि गुरुद्वारामध्ये घुसा” मग काय, हे सर्वजण बंगाला साहिब आणि रकाबगंज गुरुद्वारात बळजबरीने घुसले.

खरंतर गुरुद्वार हे सर्वांसाठी खुले असते, तिथे कुणीही येऊ जाऊ शकते. पण या कॉकरोच प्रवृत्तीच्या लोकांना कुठेही जाऊन केवळ घाणच पसरवायची असते. हे लोक गुरुद्वारात जाऊन राजकारण करू लागले, जोरदार घोषणाबाजी केली आणि हातात फलक फडकवले. विशेष म्हणजे, अनेकांच्या डोक्यावर वस्त्रही नव्हते आणि ते पवित्र ठिकाणी प्रचंड आरडाओरडा करत होते.

जेव्हा गुरुद्वाराच्या व्यवस्थापकांनी त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली, तेव्हा हे लोक उद्धटपणे वागले आणि जागेवरून हलले नाहीत. अखेर व्यवस्थापकांना नाइलाजाने पोलिसांना बोलवावे लागले.

पोलिस येताच ‘आप’च्या नेत्यांनी पुन्हा नेहमीचे नाटक सुरू केले. “पहा, दिल्ली पोलीस गुरुद्वारांचा कसा अपमान करत आहेत आणि बूट घालून गुरुद्वारात प्रवेश करत आहेत!” असा कांगावा त्यांनी सुरू केला.

पण सत्य हे होते की, पोलीस केवळ त्या जागेपर्यंत गेले होते जिथे लोक आपले बूट काढतात; म्हणजेच जिथपर्यंत बूट घालून जाण्याची परवानगी असते. मात्र, ‘आम आदमी पार्टी’ने या किरकोळ गोष्टीचा मोठा फुगा केला आणि आता आगामी पंजाब निवडणुकीत राजकीय पोळी भाजण्यासाठी या खोट्या मुद्द्याचा वापर केला जात आहे.या संपूर्ण घटनेचा पोलखोल करणारा एक व्हिडिओ दिल्ली शिख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे (DSGMC) अध्यक्ष हरमीत सिंह कालका यांनी जारी केला आहे, ज्यावरून स्पष्ट होते की ‘आप’ किती धोकादायक आणि खालच्या पातळीचे आणि घाणेरडे राजकारण करत आहे.

जनतेने १९८४ चा तो काळा काळ विसरता कामा नये, जेव्हा काँग्रेसच्या पाळलेल्या भिंद्रानवाल्याने सुवर्णमंदिराला आपली जहागीर समजून तिथे शस्त्रास्त्रांनी सज्ज लोकांना तैनात केले होते. पुढे त्याचा नंगानाच रोखण्यासाठी भारतीय सैन्याला पाचारण करावे लागले होते.त्यावेळीही हाच गवगवा करण्यात आला होता की, “सेना बूट घालून गुरुद्वारात आत जाईल आणि गुरुद्वाराचा अपमान होईल!” पण प्रश्न हा आहे की, अपमान तर तेव्हाच झाला होता जेव्हा पवित्र धार्मिक स्थळांवर हत्यारे घुसविण्यात आले होते. आज अगदी तसंच, ‘आम आदमी पार्टी’ने राजकीय स्वार्थासाठी गुरुद्वाराना राजकीय आखाडा बनवले आहे.दुसरीकडे, भारतीय जनता पार्टी नेहमीच देशाची सुरक्षा, सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक स्थळांच्या पावित्र्यासाठी कटिबद्ध राहिली आहे. भाजपने अशा निंदनीय कृत्यांचा तीव्र निषेध केला असून, धार्मिक स्थळांचा वापर राजकारणासाठी करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

आज दिल्लीतील जनता आणि देशवासीय उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत की, ‘आम आदमी पार्टी’ आणि त्यांचे छुपे हस्तक (कॉकरोच जनता पार्टी) सत्तेच्या लाोभात कुठल्या थराला जाऊ शकतात. अशा विकृत मानसिकतेच्या लोकांना आणि त्यांच्या राजकीय हस्तकांना वेळीच ओळखून वेळीच ठेचले पाहिजे, अन्यथा या देशविरोधी कृत्यांचे परिणाम भविष्यात अत्यंत घातक ठरू शकतात. शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रम सिंग मजाठिया एका मुलाखात एक सांगितले

संबंधित पोस्ट

🇮🇳 देशात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध — अफवांवर विश्वास ठेवू नका!

अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घडवले लोकधारेचे दर्शन !शिर्डीत जलसंपदा विभागाचा सांस्कृतिक सोहळा उत्साहात 

vishwatmaklokswamivarta

तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी घेतले दर्शन

आंतरराज्य समन्वय बैठकीतील निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी करावी,सांगली पाटबंधारे विभागाची कर्नाटक शासनास विनंती- हिप्परगी बॅरेजचे सर्व गेट पूर्णपणे खुले ठेवावेत- अलमट्टी धरणाची पाणीपातळी मर्यादित राखण्याचे आवाहन

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ

मिशन भरारी’ अंतर्गत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यां चे इस्रो अभ्यासदौऱ्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत होणार प्रयाण