vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

7 डिसेंबर रोजी अलिबाग येथे महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचे आयोजनअलिबाग व मुरुड तालुक्यांतील प्रलंबित अपिलांचा जलदगतीने निपटारा होणार

7 डिसेंबर रोजी अलिबाग येथे महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालतीचे आयोजनअलिबाग व मुरुड तालुक्यांतील प्रलंबित अपिलांचा जलदगतीने निपटारा होणार

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी: अलिबाग येथील उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयात सोमवार, दि07 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालती’चे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीच्या माध्यमातून अलिबाग व मुरुड तालुक्यांतील प्रलंबित अपिलांचा जलदगतीने निपटारा करण्याचे उद्दिष्ट असून, समेटाने मिटू शकणाऱ्या प्रकरणांमध्ये संबंधित विधिज्ञ व पक्षकारांनी लेखी म्हणणे सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले आहे.

उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या न्यायालयातील प्रलंबित अपिले व दाव्यांच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी यांनी 27 ऑगस्ट 2026 रोजीच्या आदेशान्वये या न्यायालयात ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ आयोजित करून अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या उपविभागीय अधिकारी, अलिबाग यांच्या न्यायालयात ही लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. उपविभागातील अलिबाग व मुरुड तालुक्यांतील संबंधित विधिज्ञ आणि पक्षकारांनी या सुनावणीस उपस्थित राहावे. तसेच, समेटाने मिटविता येणाऱ्या प्रकरणांमध्ये आपले लेखी म्हणणे न चुकता सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी श्री.चव्हाण यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

आरसीडब्ल्यूएच्या वतीने ५०० रोपांचे वृक्षारोपण

🏵️*फादर्स डे-२१ जून*भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी *फादर्स डे* साजरा 

बुलढाण्यात अवैध मद्यविक्री विरोधात धडक मोहीम; ११० गुन्हे, १४.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

शेतकरी शास्त्रज्ञ पुरस्कारासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा

सीआयएसएफ’ च्या वतीने वंदे मातरम्’ सुरक्षित तटम समृद्ध भारतम’, सायक्लोथॉन- २०२६ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणासंदर्भात उच्चस्तरीय समितीची महत्त्वाची बैठक कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा प्रमाणपत्र प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासह प्रलंबित प्रश्नांवर होणार सविस्तर चर्चा

vishwatmaklokswamivarta