vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर“अमृत दुर्गोत्सव 2026” मध्ये सहभागी होण्याचे रायगडकरांना आवाहन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर“अमृत दुर्गोत्सव 2026” मध्ये सहभागी होण्याचे रायगडकरांना आवाहन

रायगड- प्रतिनिधी: संकट रयतेवर होतं… चिंता राजाला होती. दुष्काळाच्या कठीण काळात रयतेला सावरण्यापासून ते स्वराज्याला सक्षम करण्यापर्यंत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कार्याच्या केंद्रस्थानी होती रयत आणि तिचं हित.त्या रयतेच्या राजाची दूरदृष्टी, स्वराज्य उभारण्याची जिद्द आणि लोककल्याणाचा विचार आजही आपल्याला प्रेरणा देतो.यंदा दुर्ग घडवताना केवळ इतिहासाची प्रतिकृती नको, तर त्या विचारांप्रती आपली कृतज्ञता घडवू या. मातीच्या प्रत्येक कणातून शिवरायांचे स्मरण करूया…प्रत्येक दुर्गातून त्यांच्या कार्याला मानवंदना देऊया…कारण हा केवळ दुर्ग नाही, ही रयतेच्या राजाला दिलेली आपली मानवंदना आहे. चला, कृतज्ञतेचा दुर्ग घडवू या! चला साकारूया गड-दुर्गांची प्रतिकृती अमृत दुर्गोत्सव 2026 मध्ये सहभागी होण्याचे अमृत संस्थेचे आवाहन

दिवाळीच्या सुट्टीत आपल्या अंगणात, गच्चीवर किंवा सोसायटीच्या आवारात गड-दुर्गांची प्रतिकृती साकारण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. ती जपत, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) च्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी आपल्या हाताने साकारलेल्या दुर्गाच्या प्रतिकृतीचे छायाचित्र किंवा सेल्फी काढून www.amrutdurgotsav.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावे. नोंदणीची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2026 आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह तरुण, पालक, शिक्षक आणि सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सहभागींच्या छायाचित्रांची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद करण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. शिवरायांच्या राष्ट्रभक्तीच्या या तेजाला आपण आपल्या कृतीची जोड देऊ या चला तर मग, आपल्या कल्पकतेतून स्वराज्याचा इतिहास साकारूया! गड-दुर्गांच्या संवर्धनाचा आणि शिवशौर्याच्या गौरवशाली परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या ‘अमृत दुर्गोत्सव 2026’ मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होऊया!

      आधिक माहिती साठी संपर्क :- www,mahaamrut,org,in, रायगड जिल्हा व्यवस्थापक- ९११२२२८७५९, श्री शैलेश मराठे ९४२३८९२१८२ कु मंगेश ढेबे ८१४९५५२१४३.

००००००

संबंधित पोस्ट

सिंदखेडराजा येथे ५ जूनला पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा; बेजगारांसाठी सुवर्णसंधी

नसरापुरच्या त्या नराधमाला भरचौकात फाशी द्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*  

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ

शेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार – यावेळी बांधकामाची पाहणी करण्यात आली  वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ   

शासन व पोलिसांचे कार्य जनतेची सेवा करणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६९वा अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा

बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यामुळे वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी आपल्या जनावरांची सुरक्षितता राखावी आणि रात्री एकटं बाहेर पडू नये असं आवाहन