vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 20 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सेवा सहकारी संस्थांना काम वाटपासाठी 20 जुलै पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

        सांगली, प्रतिनिधी : बेरोजगारांच्या सेवा सोसायटींना कामे वाटपासाठी जिल्ह्यातील 5 शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता जिल्हास्तरीय काम वाटप समितीकडे मागणी प्राप्त झाली आहे. काम करण्यास इच्छुक असणाऱ्या तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या सेवा सहकारी संस्थांनी काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव दरपत्रकासह दि. 20 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त इनुजा शेख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

            शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तासगाव, पलूस, विटा व आटपाडी यांच्याकडे प्रत्येकी एक सफाईगार व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली यांच्याकडे तीन सफाईगार अशी एकूण 07 सफाईगार कर्मचारी बाबत कामे आहेत. कामाचा कालावधी 11 महिन्याचा असून मोबदला प्रतिदिन 579 रूपये आहे (मा. कामगार आयुक्त यांच्याकडून वेळोवेळी प्रसिध्द करण्यात आलेल्या दरपत्रकानुसार).

अटी व शर्ती

बेरोजगारांची स्थापन केलेली सहकारी सेवा सोसायटी यांची स्थापना ही ऑगस्ट 2000 नंतर झालेली असावी. तसेच सहकार कायदा 1960 अन्वये नोंदणीकृत असावी. सहकारी सेवा सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे (प्रस्तावासोबत प्रत जोडावी).

सदर काम करणेस सहकारी सेवा सोसायटी सक्षम असावी व संस्थेच्या अधिनियमात उद्देश स्पष्ट केलेले असणे आवश्यक आहे (प्रस्तावासोबत प्रत जोडावी). सदर काम करण्यास सहकारी सेवा सोसायटी सक्षम असावी व संस्थेच्या अधिनियमात उद्देश स्पष्ट केलेले असणे आवश्यक आहे (प्रस्तावासोबत प्रत जोडावी). सहकारी सेवा सोसायटी सहा महिने कार्यरत असणे आवश्यक तसेच त्यांनी यापूर्वी काम केलेले असणे आवश्यक आहे, तसेच केलेल्या कामाचा तपशील कामाच्या रक्कमेसह देणे आवश्यक आहे. (प्रस्तावा सोबत मिळालेल्या कामाचा पुरावा जोडावा). संस्थेचे आर्थिक उलाढालीचे नियमित व अद्ययावत वार्षिक लेखा परिक्षण, लेखा परिक्षकांकडून केलेले (मार्च २०२६ अखेर) असणे आवश्यक आहे (प्रस्तावासोबत प्रत जोडावी). सेवा सोसायटीतील सदस्य क्रियाशील असणे आवश्यक आहे. संस्थेच्या उपविधीमध्ये काही बदल केले असतील तर सहकार खात्याच्या मान्यतेसह बदलाची प्रत असणे आवश्यक आहे (प्रस्तावासोबत प्रत जोडावी). संस्थेस शासकीय अनुदान प्राप्त झाले असल्यास अनुदान विनियोग प्रमाणपत्रासह लेखा परिक्षण अहवाल सादर करणे आवश्यक आहे (प्रस्तावासोबत प्रत जोडावी). संस्थेच्या सर्व सभासदांच्या चालू असलेल्या सेवायोजन नोंदणीची प्रत. सहकारी सेवा सोसायटीचे खाते सहकारी बँक / राष्ट्रीयकृत बँकेत काढलेले असावे. सदर अर्जासोबत उपविधीमध्ये नमूद असलेल्या कार्यक्षेत्राच्या पानाची साक्षांकित प्रत जोडावी. सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती/प्रमाणपत्र मुळ प्रस्तावासोबत जोडणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत सदर कामाचे बंद लिफाफ्यामध्ये दरपत्रक सादर करावे. संस्था अवसायनात निघाली असेल तर प्रस्ताव सादर करण्यात येवू नये.

00000

 

 

 

संबंधित पोस्ट

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालयकार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर· १२ ऑगस्ट २०२५ रोजी पुरस्कार वितरण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

vishwatmaklokswamivarta

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम

यशकथा-उद्योजकतेकडे यशस्वी वाटचाल; जिद्दीच्या बळावर उभारला स्वतःचा उद्योग

पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहराला जोडणारा सांगवी बोपोडी पूल तीन महिन्यासाठी वाहतुकीस बंद

vishwatmaklokswamivarta

कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta

सुविधा केंद्रांचे महत्वाचे योगदान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने मुंबई महानगर प्रदेशात स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला गती· ७.५ लाख नागरिकांना स्वच्छतेचे शिक्षण· ५.५ लाख नागरिकांनी घेतला सुविधा केंद्राचा लाभ

vishwatmaklokswamivarta