vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी अनुदानाची माहिती‘विशेष सहाय्य योजना डीबीटी अनुदान माहिती’ ॲपद्वारे तपासावी

 

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी अनुदानाची माहिती‘विशेष सहाय्य योजना डीबीटी अनुदान माहिती’ ॲपद्वारे तपासावी

        सांगली, प्रतिनिधी : केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना तसेच राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना डीबीटीद्वारे आधारकार्डला लिंक असलेल्या खात्यावर अनुदान जमा केले जाते. लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले आहे किंवा नाही, याची माहिती मिळविण्यासाठी आता ‘विशेष सहाय्य योजना डीबीटी अनुदान माहिती’ हे ॲप’ उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे संजय गांधी योजना सांगली शहर तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

       जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या संकल्पनेतून ‘विशेष सहाय्य योजना डीबीटी अनुदान माहिती’ हे ॲप तयार करण्यात आले असून, त्याचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 3 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या महसूल दिनाच्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.

        या ॲपच्या माध्यमातून लाभार्थ्यांना https://script.google.com/macros/s/AKfycbyVD_akq_Eq3DS-v_qmZqHtJDN1cgEiY2sIrNXmmsA8qLeFNMaAzGhWKzs6pZqSzk25/exec या लिंकवर किंवा क्यूआर कोड ओपन करून आधार क्रमांकातील शेवटचे 4 अंक टाकल्यानंतर अनुदान जमा झाले आहे किंवा नाही, तसेच कोणत्या कारणामुळे अनुदान मिळाले नाही, याची माहिती सहजपणे मिळवू शकणार आहेत. याशिवाय त्रुटी असल्यास त्या दूर करण्याबाबतची माहितीही ॲपवर उपलब्ध होणार आहे. यामुळे लाभार्थ्यांना अनुदानाबाबत तहसील ऑफिस किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. त्यामुळे त्यांचा पैसा, श्रम व वेळेची बचत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले

संबंधित पोस्ट

माथाडी कामगारांच्या हिताचे रक्षण करा – मंत्री आकाश फुंडकर

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व वित्तमंत्री कनूभाई देसाई यांच्या उपस्थितीत डाईंग अँड पेगमेंट्स असोशिएशन अमृत महोत्सव साजरा करणार..

उष्णतेमुळे शाळा सकाळी ७ ते ११ यावेळेत भरणार

गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी विशेष प्रयत्न करणार- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे· द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कार विजेत्यांचा सन्मान

प्राथमिक शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी;परिस्थितीचे भान राखणाऱ्या शिक्षकांचेशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून कौतुक

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वीपणे राबविण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाड्यांमध्ये दिव्यांग प्रोटोकॉल प्रशिक्षण संपन्न..