vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

पोवई नाक्यावरील बाळासाहेब देसाई स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी सातारा शहरातील पोवई नाक्यावरील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मारकाचे उर्वरित सर्व काम अत्यंत वेगाने आणि तातडीने पूर्ण करण्यात यावे. लवकरच या स्मारकाचे लोकार्पण होणार असल्याने सर्व यंत्रणांनी वेळेत कामे पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री श्री. देसाई यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. आढावा बैठकीला नगराध्यक्ष अमोल मोहिते, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोनपे, तहसीलदार अनंत गुरव, नगर प्रशासन अधिकारी अभिजीत बापट यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ऐतिहासिक प्रतापगडावरील संवर्धन आणि विविध विकासकामांचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी कामाचा वेग वाढवण्याचे आदेश दिले. प्रतापगड येथील संवर्धनाची सर्व कामे येत्या तीन महिन्यांच्या आत पूर्ण करावीत. गडावर येणाऱ्या पर्यटकांना आणि शिवप्रेमींना प्रतापगडाचा जाज्वल्य इतिहास व्यवस्थित समजावा यासाठी विशेष पटकथा तयार करण्यात यावी. यासाठी तज्ज्ञ इतिहासकारांची मदत घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

  किल्ले प्रतापगडावर भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ७० जणांची बसण्याची क्षमता असलेले सुसज्ज प्रेक्षागृह तयार करण्यात यावे. गडावरील संवर्धन, प्रेक्षागृह निर्मिती आणि इतर सर्व कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एकाच मुख्य एजन्सीची नियुक्ती करावी, जेणेकरून कामांचा दर्जा उत्तम राहील आणि सर्व कामे विहित मुदतीत पूर्ण होतील, अशा सूचनाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.

बांधकाम विभागाने किल्ले प्रतापगडाची माहिती त्याचा इतिहास पर्यटकांसाठी असणाऱ्या सुविधांचा समावेश असलेली कृत्रिम बुद्धेतेवर आधारिक व्हीडीओ क्लिप तयार करावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

बोर्गेवाडी (मेंढोशी) ता. पाटण गावाचा पुनर्वसन आढावा घेतला पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले या गावातील 89 कुटुंब बाधित आहेत. त्यांचे मौजे सडावाघापूर येथे पुनर्वसन करण्यासाठी जागा उपलब्ध आहे. ही जागा अंतिम करावी. बांधित कुटुंबाला किमान तीन गुठ्ठे जागा मिळावी. या पुनर्वसनाचा प्रस्ताव संबंधित अधिकाऱ्यांना सकारात्मक तयार करुन तो शासनाकडे पाठवावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

बैठकीनंतर पालकमंत्री श्री. देसाई यांनी करंजे नाका येथे उभारण्यात येणाऱ्या सैनिक संकुलच्या जागेचही पहाणी केली.

0000

संबंधित पोस्ट

राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

राज्य लॉटरीच्या डिसेंबर महिन्यातील भव्यतम, मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर

केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते २९ जून रोजी ‘आरोग्य सेतू २.०’ चा होणार शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta

२० नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र बाल संसद २०२६’ चे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कंधारमधील तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते लोकार्पण शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि विकसित उद्यान नागरिकांच्या सेवेत दाखल

vishwatmaklokswamivarta