vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पाणी फाउंडेशन आयोजित संपूर्ण महाराष्ट्र ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२७’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

पाणी फाउंडेशन आयोजित संपूर्ण महाराष्ट्र ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२७’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई प्रतिनिधी-

पाणी फाउंडेशन आयोजित संपूर्ण महाराष्ट्र ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२७’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, अभिनेते आमिर खान, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर, कृषी विभागाचे सचिव परिमल सिंग, मुख्यमंत्र्यांचे जलविषयक सल्लागार श्रीराम वेदिरे, पाणी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून गावे जलसमृद्ध करण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाजाने एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जलसमृद्धीसाठी ‘सत्यमेव जयते वॉटर कप’अभियानाला लोकचळवळीचे बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. या अभियानाच्या माध्यमातून दुष्काळाविरुद्धची लढाई लोकचळवळ म्हणून उभी करावी. आपल्या सर्वांचा एकच पक्ष तो म्हणजे ‘दुष्काळ विरोधी पक्ष’ असून यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असेही मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी मांडले.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी ‘कन्व्हर्जन्स, कम्युनिकेशन आणि कोऑर्डिनेशन’ या तीन बाबींवर विशेष भर द्यावा. योजनांचे एकत्रीकरण, त्याबाबतची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणे आणि सर्व विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधणे आवश्यक आहे. पावसाळ्यापूर्वी नियोजित जलसंधारणाची सर्व कामे पूर्ण करावीत. प्रशासकीय मान्यता आणि तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियेत विलंब होऊ नये. प्रत्येक दिवस महत्त्वाचा असून प्रशासनाने ग्रामस्थांच्या आधी तयारीत राहून कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

गावांमध्ये वॉटरशेड आणि सूक्ष्म जलसिंचनाचे शास्त्रीय नियोजन करून सर्व आवश्यक उपचार पूर्ण करणे गरजेचे आहे. यापूर्वी राबविण्यात आलेल्या ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ उपक्रमामुळे जलस्रोतांची क्षमता वाढण्यास आणि शेतीची सुपीकता सुधारण्यास मदत झाली आहे. त्याच धर्तीवर यंदाच्या उपक्रमातही सर्व उपलब्ध योजनांचा समन्वय साधावा, असे त्यांनी सांगितले.जलस्रोतांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करून जलसंधारणाच्या माध्यमातून ते पुन्हा जलपरिपूर्ण करणे, भूजल पातळी योग्य राखणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करणे यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करणे गरजेचे आहे.

वॉटर कप स्पर्धेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनाच्या सर्व विभागांनी ‘होल ऑफ गव्हर्नमेंट’ दृष्टिकोनातून एकत्रित काम करावे. शासनाच्या विविध योजनांचे अभिसरण करून उपलब्ध निधी, मनुष्यबळ आणि संसाधनांचा प्रभावी वापर करावा. जलसंधारण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थांनीही या लोकचळवळीत सहभागी करून घ्यावे. जलयुक्त शिवार अभियान ३.० आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची सांगड वॉटर कपशी घालून उपलब्ध निधी, मनुष्यबळ आणि संसाधनांचा प्रभावी वापर करावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. या उपक्रमासाठी राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पाणी फाउंडेशनची टीम, शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, तालुकास्तरीय यंत्रणा, सरपंच आणि ग्रामपंचायतींचे अधिकारी यांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत. सर्वांनी या लोकचळवळीत सक्रिय सहभाग घेऊन गावांना जलसमृद्ध करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करून मुख्यमंत्र्यांनी सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

राज्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देऊन गावागावांत जलसंधारणाची लोकचळवळ उभी करण्याच्या उद्देशाने वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेत राज्यातील सुमारे २० हजार गावांचा सहभाग अपेक्षित असून, त्यासाठी सुमारे ८० हजार नागरिकांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

‘जलयुक्त शिवार’ अभियानाच्या सुरुवातीच्या काळात राज्य शासनासोबत पाणी फाउंडेशननेही समांतरपणे काम केले. या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि अवघ्या तीन वर्षांत ७५ तालुक्यांपर्यंत ही चळवळ पोहोचली. प्रशासन, सामाजिक संस्था, पाणी फाउंडेशन, विविध भागीदार आणि स्वयंसेवक यांनी एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांतून प्रभावी आणि परिवर्तनकारी परिणाम साध्य झाले, असे अभिनेता आमिर खान यांनी सांगितले.

सध्याची दुष्काळी परिस्थिती सर्वांसाठी आव्हानात्मक आहे. या आव्हानात्मक परिस्थितीकडे ऐतिहासिक काम करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे. राज्य आणि देशासाठी महत्त्वपूर्ण योगदान देण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने आणि सामूहिक भावनेने काम करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

#MahaWaterCup

संबंधित पोस्ट

जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाची धडक मोहीम; 4 हजार 100 रुपयांचा दंड वसूलअवैध तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख-सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारी

vishwatmaklokswamivarta

माऊली’ संगीतमय नाट्यप्रयोगातून संत ज्ञानेश्वरांच्याजीवनचरित्राचा दिव्य आविष्कार,ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त,भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा सुरेल संगम

87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात #विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अंतर्गत सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी गेल्या १० महिन्यांत दिलेल्या १४ आदेशांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं आज नकार

vishwatmaklokswamivarta

कांदळवनाचे संरक्षण करणाऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविणार – वनमंत्री गणेश नाईक