vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशनच्या अध्यक्षपदी माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार तरुणांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही

मुंबई, प्रतिनिधी : “ई-स्पोर्ट्स गेम्स फेडरेशन” (ESGF) च्या अध्यक्षपदाची धुरा इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्वीकारली. देशातील २२ राज्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या फेडरेशनच्या सर्वसाधारण बैठकीत ॲड. शेलार यांची निवड करण्यात आली.

माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, ई-स्पोर्ट्स क्षेत्राला अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि व्यावसायिक स्वरूप मिळावे, त्यातून आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होऊ शकेल व आपल्या देशात रोजगार उपलब्ध होऊ शकेल. युवा पिढीतील डिजिटल कौशल्यांना व्यासपीठ देतानाच ई-स्पोर्ट्सला केवळ मनोरंजन किंवा गेमिंग न मानता कौशल्य, शिस्त, प्रशिक्षण आणि करिअरची संधी असलेले क्षेत्र म्हणून विकसित करण्याचे आव्हान स्वीकारून तरुणांसाठी काम करू. मैदानी खेळाप्रमाणे ई-स्पोर्ट्समध्येही प्रावीण्य असलेले खेळाडू तयार करू. त्यासाठी विविध राज्यांच्या फेडरेशनशी समन्वय साधून केंद्र सरकारशी आवश्यक तो संवाद साधू, असेही नवनियुक्त अध्यक्ष शेलार यांनी सांगितले

ESGF ही आपल्या देशातील ई-स्पोर्ट्सच्या विकासासाठी कार्यरत महत्त्वाची संस्था असून या क्षेत्रात झपाट्याने होणारी वाढ पाहता यातील नव्या संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. आपल्या देशात ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग क्षेत्राचा विस्तार प्रचंड वेगाने होत आहे. भारतात सुमारे ५२ कोटी गेमर्स असून दिवसाला ११ कोटी खेळाडू खेळतात. आपल्या देशात २८ या खेळांच्या टूर्नामेंट होतात. हे गेम पाहणाऱ्यांची संख्या सुमारे ८ ते ९ कोटी एवढी आहे. पारंपरिक क्रिकेट, फुटबॉल किंवा हॉकीमध्ये जसे राष्ट्रीय संघ, निवड प्रक्रिया, स्पर्धा, प्रशिक्षण, नियम आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वाची व्यवस्था असते, त्याच धर्तीवर ई-स्पोर्ट्समध्येही एक संरचित व्यवस्था उभारण्याचे काम हे फेडरेशन करते.

क्रिकेट, फुटबॉल, दोरीउड्या, दहिहंडी, साहसी खेळ अशा विविध मैदानी खेळांच्या फेडरेशन व संघटनांवर काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ॲड. आशिष शेलार यांच्या नियुक्तीमुळे या क्षेत्राला नवी चालना मिळेल, असा आशावाद फेडरेशनने व्यक्त केला आहे.

००००

संबंधित पोस्ट

वारकऱ्यांच्या सुरक्षितता, सुविधांना प्राधान्य देऊन समन्वयाने नियोजन करा – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन

एकरकमी कर्ज परतफेड योजना’ राबविण्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचे निर्देश

🌧️ रायगड जिल्ह्यासाठी IMD नाऊकास्ट इशारा (सायं. ७:०० ते रात्री १०:००)

नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार

उष्णतेच्या लाटेबाबत जिल्हा प्रशासनाचा इशारा