vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचेल    — पर्यटन मंत्री शंभूराज देसाई  विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणपतीचे घेतले दर्शन

गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध परंपरा जागतिक पातळीवर पोहोचेल    — पर्यटन मंत्री शंभूराज देसाई  विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील गणपतीचे घेतले दर्शन

      मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन जगभरातील पर्यटकांना घडविणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मुंबईतील विविध गणेशमंडळांना भेट देऊन बाप्पांचे दर्शन घेतले. यामध्ये फिनलंड, फ्रान्स, थायलंड, नॉर्वे, चीन, बेल्जियम, स्वीडन आणि इजिप्त या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचा गणेशोत्सव, त्याची ऐतिहासिक परंपरा आणि मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची माहिती या प्रतिनिधींना देण्यात आली.

   पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे, सामाजिक एकतेचे आणि लोकसहभागाचे प्रतीक आहे. या उत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची कला, परंपरा, इतिहास, लोकजीवन आणि आतिथ्यशीलता जगभर पोहोचत आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पर्यटनाचा अनुभव मिळावा, यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांना दिली भेट, माटुंगा येथील खालसा महाविद्यालयात परदेशी पाहुण्यांचे पारंपारिक फेटे बांधून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी मुंबईतील ऐतिहासिक आणि लोकप्रिय गणेशोत्सव मंडळांतील गणेशाचे दर्शन घेतले. माटुंगा येथील जी.एस.बी. गणपती, वडाळा येथील जी.एस.बी. सार्वजनिक गणेशोत्सव-गणेश गल्ली येथील ‘मुंबईचा राजा’, गिरगावातील केशवजी नाईक चाळ येथे भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा होणारा प्रमुख उत्सव आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, लोकपरंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश याची माहिती पाहुण्यांना देण्यात आली.

विविध देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग, गणेशोत्सवाच्या निमित्ताने फिनलंडच्या उप वाणिज्यदूत जोन्ना सुनी, फ्रान्सचे वाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हरिनो आणि सामंथा नुवेल, थायलंडच्या वाणिज्यदूत सिरिपॉर्न सुपानिमितविसेतकुल, वाणिज्यदूत थितीपोर्न चुचिन्नावत, नाक्रिसोर्न क्लाइकाओ आणि व्हाइस कॉन्सुल अरुणलुक इम्सुब यांनी सहभाग घेतला. नॉर्वेच्या वाणिज्यदूत मोनिका ओम्मुंडसेन नागेलगार्ड आणि जेनी ब्रँडाल, बेल्जियमचे वाणिज्यदूत पियरे स्टेव्हर्लिन्क तसेच स्वीडनच्या वाणिज्यदूत यांच्या पत्नी साने यामादा यांची उपस्थिती होती. चीनच्या वतीने वाणिज्यदूत जी श्युएचुई, कॉन्सुल वांग जिनशेंग, उपवाणिज्यदूत मा झोउचेन, झू युचियान, लिन, वू तसेच कॉन्सुलेटमधील अन्य अधिकारी व कुटुंबीय सहभागी झाले. इजिप्तच्या वाणिज्यदूत जनरल दिना अल अहे यांचाही सहभाग होता.

            यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी परदेशी मान्यवरांचे या उपक्रमाला भेट दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, मुंबई शहरचे अपर जिल्हाधिकारी बाप्पासाहेब थोरात, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि व्यवस्थापक मानसी कोठारे उपस्थित होते.

0000000

संबंधित पोस्ट

श्रीमती अंजली शर्मा, भाप्रसे यांनी स्वीकारला जालना महानगरपालिका आयुक्तपदाचा पदभार

जालना मनपात तब्बल तेरा वर्षांनी शिक्षक दिन उत्साहात शिक्षण सभापती भाग्यश्री जोगस यांच्या पुढाकारातून शिक्षकांचा शाल व ट्रॉफी देऊन सन्मान शिक्षकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे सभागृह नेते महेशराव निकम यांचे आश्वासन

vishwatmaklokswamivarta

युआयटीच्या पहिल्या बॅचने आपल्या कामगिरीतून संस्थेची नवी ओळख घडवावी – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**बी.टेक. विद्यार्थ्यांचा ‘दीक्षा आरंभ’ उत्साहात; तांत्रिक ज्ञानासोबत व्यावहारिक कौशल्य व आत्मविश्वास विकसित करण्याचे आवाहन*दोन महिन्यांच्या इंटर्नशिपमधून विद्यार्थ्यांना मिळणार उद्योगांचा प्रत्यक्ष अनुभव; विविध कंपन्या व उद्योगांमध्ये करिअरच्या व्यापक संधी*राज्यस्तरीय ॲथलेटिक्समध्ये चमकलेल्या मोनिका सानू मडावीचा गौरव; गडचिरोलीत सुसज्ज ॲथलेटिक ट्रॅक उभारणीला शासनाची मंजुरी*

vishwatmaklokswamivarta

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; तालुकास्तरीय समित्या गठीत

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषदेचा आरोग्यदूत उपक्रम स्तुत्य; विद्यार्थीच करतील गावांचा कायापालट – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

रायगडमधील प्रलंबित रस्ते कामांना गती द्या-मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन तातडीने पूर्ण करावे– मंत्री आदिती तटकरे