vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

युवकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे – डॉ. रणजित पाटील*अमरावती जिल्ह्यात 29 सप्टेंबरला तालुकास्तरावर 16 रोजगार मेळावे

युवकांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे

– डॉ. रणजित पाटील*अमरावती जिल्ह्यात 29 सप्टेंबरला तालुकास्तरावर 16 रोजगार मेळावे

 अमरावती, प्रतिनिधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि इतर संलग्न विभागांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. 29 सप्टेंबर रोजी ‘रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील यांनी केले.

 

 डॉ. पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यात एकाच दिवशी, एकाच वेळी सुमारे 900 रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून राज्यभरातील सुमारे 1 लाख युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने अमरावती विभागात 70 रोजगार मेळावे आयोजित केले जातील.

 अमरावती जिल्ह्यात 16 मेळावे होणार असून प्रत्येक तालुक्यात एक आणि अमरावती शहरात 2 मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाइन नोंदणी, क्यूआर कोड आणि ऑफलाइन, ऑन-स्पॉट नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, खासदार व आमदारांच्या उपस्थितीत या मेळाव्यांचे उद्घाटन होणार आहे.

या मेळाव्यात 9 हजाराहून युवकांनी नोंदणी केली आहे. तसेच सध्यास्थितीत कंपन्या व उद्योजकांनी दोन हजाराहून अधिक रोजगाराच्या जागांसाठी नोंदणी करण्यात आली आहे. युवकांना त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी यावेळी केले.यावेळी विभागीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष किरण पातूरकर, कौशल्य विभागाचे उपायुक्त द. ल. ठाकरे, सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

 

000000

संबंधित पोस्ट

मच्छीमारांनो सावधान..!*१ जूनपासून समुद्रात मासेमारीला बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कडक कारवाई*

पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते पोलिस विभागाच्या 12 वाहनांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील १ लाख ४० हजार शेतक-यांनी डाउनलोड केले महाविस्तार AI अप कराड तालुका राज्यात प्रथम ३०,००० शेतक-यांनी केले ॲप डाउनलोड*

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सकारात्मक निर्णयामुळे अ‍ॅड.भास्कर मगरे यांच्या आंदोलनाला यश-अभिमन्यू खोतकर दलित आदिवासी भूमिहीन कासकारांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार- दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अ‍ॅड. भास्कर मगरे

रोहणवाडी येथे अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान  नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या : ज्ञानेश्वर उगले यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

जीडीसी अँड ए’ परीक्षा 23 ते 25 रोजी ; प्रवेशपत्रासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta