vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्ह्यात तातडीने पंचनामे सुरू करावेत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

जिल्ह्यात तातडीने पंचनामे सुरू करावेत – जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे निर्देश

अमरावती, प्रतिनिधी : शासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळसदृश्य स्थिती जाहीर केली आहे. त्यामुळे यंत्रणांनी तातडीने उद्यापासूनच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी, शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 शासनाने मंजूर केला आहे. ट्रिगर 2 ची कुठलीही वाट न पाहता ट्रिगर 3 म्हणजेच क्षेत्रिय सत्यापन यासाठी पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांचा समन्वय साधून जिल्ह्यातील पंचनाम्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले.

त्यासोबतच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुकास्तरावर शेतकरी मदत कक्ष कार्यान्वित करावा. शेतकऱ्यांचे पंचनामे तसेच कर्जमुक्ती योजनेत त्यांना मिळवायचा लाभ व त्यासाठी करायची ई-केवायसी, तसेच शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी बँका व सहकार सहनिबंधक यांच्याशी आवश्यक समन्वय साधावा. तसेच कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकांद्वारे नवीन कर्ज दिले जाईल, याची खात्री करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी दिले आहे.

0000

 

 

संबंधित पोस्ट

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर 

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज -उत्तम दिघे

शिवछत्रपती क्रडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधीनीमध्ये सरळप्रवेश व खेळनिहाय कौशल्य चाचणीद्वारे प्रवेश सन 2026-27 “

शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक योजनेचा लाभ घ्यावा*- *पालकमंत्री शंभूराज देसाई*

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी कार्यालयातील नारीशक्तीची मोटारसायकल रॅली

शिवसेनेचा झंझावात जिल्ह्यात निर्माण करा- शिवसेना नेते अंबादास दानवे- गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक मोहीम- जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वांनी कामालालागावे- जिल्हाप्रमुख महेश नळगे- महिलांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा- महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे