vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे *नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्व*

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे *नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्व*

अध्यात्मिक वार्ता-

कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असे म्हणतात. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे. तर नवरात्रीत जमेल त्या दिवशी किंवा अष्टमी किंवा नवमीला कन्या पूजन करणे सर्वात श्रेष्ठ ठरेल. सर्वात आधी बघू की कोणत्या वयाची कन्या पूजल्याने काय फळ मिळतं ते:

कन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे.दोन वर्षाची कन्या कुमारिका असून हिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होतं.तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुख- समृद्धी नांदते.चार वर्षाच्या कल्याणीची पूजा केल्याने घरात कल्याण होतं.रोहिणी रूपा पाच वर्षाच्या कन्येला पुजल्याने आजारांपासून मुक्ती मिळते.सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असून हिची पूजा केल्याने राजयोग प्राप्ती होते.सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असून ऐश्वर्य प्रदान करणारी असते.शांभवी रूपात आठ वर्षाच्या कन्येची पूजा केल्यास विजय प्राप्ती होते.नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचा रूप असून शत्रूंचा नाश करते.सुभद्रा रूपात दहा वर्षाची कन्या पुजल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.आता बघू की काय करावेकुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचा रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे. पाय धुऊन त्यावर कुंकू लावावे.स्वच्छ आसनावर बसवावे.कपाळावर कुंकू लावून त्यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करवावे. किंवा प्रसाद म्हणून खीर पुरी, शिरा असे नैवेद्य दाखवावे.यथाशक्ती कुमारिकांना गजरा, दक्षिणा आणि भेट वस्तू द्यावी.आपल्या इच्छाप्रमाणे किंवा यशाशक्ती कुमारिकांचे पूजन करावे. जमत नसल्यास एक कुमारिकेचे केले तरी फळ प्राप्ती होते.

 

संबंधित पोस्ट

वसुंधरा पायी दिंडी २०२६’चा पर्यावरण संवर्धनाचा संदेश ठाण्यात ५ ऑक्टोबरला आगमन

vishwatmaklokswamivarta

त्र्यंबकेश्वर-गिरीजानंद महाराज यांची धर्मप्रसारासाठी पायी यात्रा…

vishwatmaklokswamivarta

आज देशभरात धुमधडाक्यात साजरा होत आहे हनुमान जयंती जन्मोत्सव …

🌺🌿🌺 १० फेब्रुवारी – अखंड समाधानाचा मार्ग : नामस्मरण: वृद्धांना उपदेश. 🌺☘🌺

vishwatmaklokswamivarta

महिलांच्या कलागुणांसाठी पारंपारिक मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

शांती मंत्र “ महत्व