vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आठ बालकांना दत्तक विधान आदेश प्रदान पालकांच्या मुलाखतीनंतर दत्तक विधान प्रक्रियेला मंजुरी; बालकांना मिळणार प्रेमळ कौटुंबिक आधार

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आठ बालकांना दत्तक विधान आदेश प्रदान पालकांच्या मुलाखतीनंतर दत्तक विधान प्रक्रियेला मंजुरी; बालकांना मिळणार प्रेमळ कौटुंबिक आधार

 

बुलढाणा, प्रतिनिधी: जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांच्या हस्ते दत्तक विधान प्रक्रियेअंतर्गत एकूण ८ बालकांच्या पालकांना दत्तक विधान आदेश प्रदान करण्यात आले. यावेळी संबंधित पालकांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन दत्तक विधान प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली

या प्रक्रियेमध्ये संस्था अंतर्गत २ दत्तक विधान प्रकरणे, नातेवाईकांतर्गत ४ दत्तक विधान प्रकरणे आणि सावत्र दत्तक विधानाची २ प्रकरणे अशा एकूण ८ प्रकरणांचा समावेश होता. सर्व प्रकरणांमध्ये पालकांशी सविस्तर चर्चा करून दत्तक विधान प्रक्रियेची पूर्तता करण्यात आली. बालकांच्या हितसंरक्षणाची जबाबदारी तसेच पालकांच्या तयारीबाबत माहिती घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी संबंधित प्रकरणांची पडताळणी करून सर्व आठ प्रकरणांना दत्तक विधान आदेश प्रदान केले.

या प्रक्रियेमुळे आठ बालकांना सुरक्षित, प्रेमळ व कौटुंबिक वातावरण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बालकांचे सर्वोत्तम हित जपणे आणि त्यांना कुटुंबाचा आधार मिळवून देणे हा या प्रक्रियेचा मुख्य उद्देश आहे. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, संरक्षण अधिकारी सागर राऊत, दत्तक विधान संस्था दि लक ट्रस्ट संस्थेचे व्यवस्थापक गजानन कुळकर्णी तसेच दत्तक घेणारे पालक उपस्थित होते.

प्रकरणे निकाली काढताना जिल्हाधिकारी यांनी पालकांसोबत चर्चा केली तसेच बालकांसोबत वेळ घालवला. बालकांना चॉकलेट वाटप करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

00000

संबंधित पोस्ट

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी १५ ऑगस्टपर्यंत- मंत्री नितेश राणे

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय – मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका बुधवारपासून सुरू

vishwatmaklokswamivarta

🚨 महाड पूरपरिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष आढावा