vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका बुधवारपासून सुरू

दुचाकी वाहनाकरिता नविन मालिका बुधवारपासून सुरू

        सांगली, प्रतिनिधी : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली करीता नव्याने नोंदणी होणाऱ्या दुचाकी वाहनांकरिता एम एच 10 एफ डी (FD) ही नवीन मालिका बुधवार, दि. 25 नोव्हेंबर 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

    एम एच 10 एफ डी (FD) या मालिकेव्यतिरिक्त इतर वाहनांसाठी आकर्षक क्रमांक हवा असेल तर तिप्पट फी भरून आकर्षक नोंदणी क्रमांक देण्यात येईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाईल. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 4 तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियमाच्या 5(अ) मध्ये विहीत केलेल्या पुराव्याची छायांकित प्रत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकित प्रत, ई-मेल आयडी आवश्यक आहे. पसंतीचे नोंदणी क्रमांक वाहन 4.0 या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार असून त्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत आहे. पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या अर्जासोबत विहीत शुल्काचा डिमांड ड्राफ्ट (DY. RTO SANGLI) या नावे सादर करणे बंधनकारक आहे. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज आल्यास दि. 26 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निर्धारित फी पेक्षा जास्त रकमेची डीडी जो अर्जदार सादर करेल त्यास तो क्रमांक दिला जाईल. आकर्षक क्रमांकासाठी 180 दिवसांच्या आत वाहन नोंदणी करणे बंधनकारक राहील.

लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुचाकी वाहनांची एम एच 10 एफ डी (FD) ही नोंदणी क्रमांक मालिका दिनांक 30 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन पध्दतीने बुकिंग करण्यासाठी उपलब्ध होणार आहे. इच्छुक नागरिकांनी fancy.parivahan.gov.in/fancy/faces/public/login.xhtml या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने नोंदणी क्रमांक बुकिंग प्रक्रियेचा लाभ घ्यावा. काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास दुसऱ्या दिवशी 01 डिसेंबर 2026 रोजी दुपारी 12 वाजता ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करण्यासाठी उपलब्ध होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र माझा! मराठी माझी संवाद भाषा!’अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अमराठी चालकांनी तातडीने सहभागी व्हावे- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक१८ ऑगस्ट २०२७ नंतर नियमभंग खपवून घेतला जाणार नाही

गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 241 मुली बेपत्ता…

vishwatmaklokswamivarta

जनगणनेसाठी आवश्यक घरांचे गट व सीमांकन करण्याचे काम वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया 

जनगणना २०२७च्या पूर्वतयारीला वेग; नांदेडमध्ये संक्षिप्त घर यादी प्रशिक्षण प्रगणक व पर्यवेक्षकांना जनगणना कामकाजाबाबत मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

नांदेड जिल्ह्यातील पवित्र देवभूमी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवी मंदिर परिसरात विकास आराखड्याची पाहणी केली.. देवभूमी माहूरगड  रेणुका देवी मंदिरात दर्शन घेतले..