vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जत येथे पारधी समाजाचा मेळावा– विविध शासकीय दाखले व योजनांच्या लाभांचे नागरिकांना वितरण

क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जत येथे पारधी समाजाचा मेळावा– विविध शासकीय दाखले व योजनांच्या लाभांचे नागरिकांना वितरण

        सांगली, प्रतिनिधी: क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जत येथे पारधी समाजातील नागरिकांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबरच त्यांना आवश्यक असलेले जातीचे दाखले, रेशनकार्ड, आधारकार्ड, उत्पन्नाचे दाखले तसेच आयुष्मान भारत कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

       जत येथील नदाप हॉलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग आणि जत तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास जत पंचायत समितीच्या सभापती अर्चना पाटील, जत नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगावचे प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते, गटविकास अधिकारी अविनाश पाटील, नायब तहसीलदार श्री. माने, देवराज चव्हाण, बसवराज चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते यांनी आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक विकास यांसह विविध क्षेत्रांतील योजनांचा लाभ पात्र नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले     या मेळाव्यामुळे पारधी समाजातील नागरिकांना विविध शासकीय दाखले व महत्त्वाची कागदपत्रे एकाच ठिकाणी उपलब्ध झाली. या उपक्रमास पारधी जमातीतील सुमारे ३०० ते ३५० नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

00000

 

संबंधित पोस्ट

जन्माष्टमी निमित्त लोकभवनमध्ये भजनसंध्या

vishwatmaklokswamivarta

वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नियोजन भवन· मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

पुस्तकांचे गाव’ उपक्रमासाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावेत – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अधिकाधिक निधी देऊन दुष्काळी भागाचा विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील- जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील- श्री क्षेत्र आरेवाडी येथे घेतले बिरोबाचे दर्शन- शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली ग्वाही

पुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!