vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीवर अशासकीय सदस्य निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जालना, प्रतिनिधी: राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी तसेच स्थानिक स्तरावरील समस्या तातडीने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार जालना जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीवर जिल्ह्यातील अल्पसंख्याकांसाठी कार्य करणाऱ्या तीन नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची निवड करण्यात येणार असून, त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासन निर्णय दि. 15 एप्रिल 2017 व दि. 19 जानेवारी 2026 अन्वये ही समिती गठीत करण्यात येत आहे. या समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नामनिर्देशन शासनास पाठविण्यासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या इच्छुक प्रतिनिधींनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावेत. अर्जामध्ये अर्जदाराचे संपूर्ण नाव, पत्ता, जन्म दिनांक, व्यवसाय, शैक्षणिक पात्रता, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची सविस्तर माहिती नमूद करणे आवश्यक आहे.

इच्छुक सदस्यांनी आपले परिपूर्ण अर्ज दिनांक 4 डिसेंबर 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.-*-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

46 वे विभागीय वार्षिक पुष्पप्रदर्शन 14 व 15 फेब्रुवारीला छत्रपती संभाजीनगर मध्ये….

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवात ‘सेवांचा जागर’; टपाल, विमा, आधार अन् आरोग्यसेवा एकाच छताखाली‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत खामगावात ‘गणपती नाईट कॅम्प’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

अभिमानाचा क्षण! 🇮🇳बुलढाणा जिल्ह्याचा सुपुत्र, सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील हवालदार संतोष मोरे यांना ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दाखविलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल ‘शौर्य पदक’ प्रदान

शाश्वत भविष्यासाठी पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज – राज्यपाल जिष्णु देव वर्मा ‘नमस्कार भूमी २’ या पर्यावरण जनजागृती उपक्रमाचा शुभारंभ

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या आणि आदिवासी बांधवांसाठी शासन सदैव तत्पर– सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार*

vishwatmaklokswamivarta

पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार २०२६ मध्ये महाराष्ट्राची दमदार कामगिरी राज्याला पाच राष्ट्रीय पुरस्कार,कर्ज वितरणात महाराष्ट्र देशात प्रथम, डिजिटल व्यवहारांत द्वितीय छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि परळी शहरांचाही राष्ट्रीय स्तरावर गौरव…

vishwatmaklokswamivarta