vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्वप्रशिक्षण; जिल्ह्यातील उमेदवारांना संधी

सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत पूर्वप्रशिक्षण; जिल्ह्यातील उमेदवारांना संधी

जालना, प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्यासाठी नाशिक येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रामार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील युवक व युवतींसाठी 14 ते 23 डिसेंबर 2026 या कालावधीत 68 व्या SSB कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांनी 13 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता प्रशिक्षण केंद्रात हजर राहावे. प्रशिक्षणार्थींना निवास व भोजनासह प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे.

जालना जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी 8 डिसेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune यांच्या www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील DSW Portal मधील PCTC Nashik – SSB 68 या विभागातून प्रवेशपत्र व आवश्यक परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पूर्ण भरून सोबत आणावी.

या प्रशिक्षणासाठी CDSE कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसेस, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा AFCAT परीक्षा उत्तीर्ण केलेले उमेदवार तसेच एनसीसी स्पेशल एन्ट्री, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स आणि विद्यापीठ प्रवेश योजनेंतर्गत (University Entry Scheme) पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे. संबंधित परीक्षांचे कॉल लेटर किंवा आवश्यक पात्रता प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे ई-मेल training.ptcenashik@gmail.com व दुरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

धान/भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांच्या नोंदणी प्रकियेला ३१ जानेवारी, २०२६ पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद

vishwatmaklokswamivarta

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

बी.एससी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक, गुणवत्ताधारित आणि वेळेत प्रवेश मिळावा, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

राज्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान! यवतमाळच्या नेर तालुक्यात ३६ तासांत १३३ मिमी अतिवृष्टी! पैनगंगा नदीला महापूर; मलकापूर-सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद! तर गडचिरोली जिल्ह्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर. 

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन