vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना 25 हजारांचे कन्यादान अनुदान

सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी जोडप्यांना 25 हजारांचे कन्यादान अनुदान

जालना,द प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन विवाह करणाऱ्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील दाम्पत्यांसाठी कन्यादान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र वधूच्या वडिलांच्या, आईच्या किंवा पालकांच्या नावे 25 हजार रुपयांचे अनुदान क्रॉस चेकद्वारे देण्यात येते.

तसेच सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रत्येक पात्र जोडप्यामागे 4 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी वराचे वय 21 व वधूचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे, अशी अट आहे

सन 2026-27 या वर्षासाठी सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यास इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त स्वयंसेवी संस्थांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेच्या अर्थसहाय्यासाठी अर्जाचा नमुना संबंधित कार्यालयात उपलब्ध असून, इच्छुक संस्थांनी तो प्राप्त करून प्रस्ताव सादर करावा. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक अविनाश बहिर यांनी केले आहे

-*-*-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

नागभीड–मार्कंडादेव रेल्वेमार्गासाठी संतोष सुरपाम यांचा पुढाकार!# मार्कंडेश्वर बहुउद्देशीय सुशिक्षित बेरोजगार विकास संस्थेचे केंद्रीय अध्यक्ष यांची ठाम मागणी; पर्यटन, औद्योगिक विकास आणि स्थानिक रोजगाराला चालना देण्यावर भर

vishwatmaklokswamivarta

विधानपरिषद कामकाज/नियम ९७ अन्वये अल्पकालीन चर्चा-अमरावती ‘एमआयडीसी’साठी सकारात्मक निर्णय घेणार – उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

आता नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस – महापौर श्रीम. सुजाता पाटील

vishwatmaklokswamivarta

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई आंदोलन करण्याचा हट्ट का गणेशोत्सवाच्या काळामध्ये अशा प्रकारे आंदोलन नको सरकार सर्व मागण्या मागण्याकरता चर्चा करण्यास तयार मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आशिष शेलार यांची पत्रकार परिषदेत माहिती

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शासकीय शाळांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत एका तासाच्या खेळातून

राज्यातील १५ जिल्ह्यांतील ६३३ गावे,१६५२ वाड्यांमध्ये ७०६ टँकरद्वारे पाणीपुरवठा