vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतगहू, हरभरा व रब्बी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे; कृषी विभागाचे आवाहन

रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतगहू, हरभरा व रब्बी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे; कृषी विभागाचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: नैसर्गिक आपत्ती, हवामानातील बदल आणि पिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर ओढवणारे आर्थिक संकट कमी करून त्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम २०२६-२७ मध्ये जिल्ह्यातील गहू (बागायत), हरभरा आणि रब्बी कांदा या अधिसूचित पिकांसाठी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होता येणार असून, विमा नोंदणीची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२६ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मुदतीची वाट न पाहता योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने खरीप २०२६ आणि रब्बी हंगाम २०२६-२७ या एक वर्षाच्या कालावधीसाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याची सुविधा ऐच्छिक ठेवण्यात आली आहे.बुलढाणा जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी नियुक्त : बुलढाणा जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भरावयाचा पीकनिहाय विमा हप्ता प्रति हेक्टर पुढीलप्रमाणे आहे. गहू (बागायत) पिकासाठी ११२ रुपये ५० पैसे, हरभरा पिकासाठी १८० रुपये, तर रब्बी कांदा पिकासाठी ४ हजार ७५० रुपये विमा हप्ता निश्चित करण्यात आला आहे.

ऑनलाइन व सीएससी केंद्रांवरून नोंदणीची सुविधा : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः ऑनलाइन नोंदणी करता येईल. तसेच बँका, विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप आणि सामूहिक सेवा केंद्रांच्या (CSC) माध्यमातूनही अर्ज सादर करता येणार आहेत.

कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेमार्फत विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळविणे बंधनकारक आहे.

तालुकानिहाय विमा प्रतिनिधींची नियुक्ती : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय विमा प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. बुलढाणा तालुक्यासाठी सुरेश कुमावत (७२४०४६६६७६), महावीर चिकटे (८४८२८१९०८२), मंगेश गाडेकर (९६६५०१२६३५), ऋषिकेश टांगडे (७५५९३७९६३९) आणि अमोल दत्तू गाडेकर (९५८८४११५८८) यांच्याशी संपर्क साधता येईल.तसेच शेगाव – दीपक गळकर (९६३७८४६७९४), चिखली – योगेश लहाने (७७७५९००४५३), सिंदखेड राजा – योगेश्वर मांते (८५५४८४४९१२), मेहकर – आशिष पुरी (७०२८४४४६८५), जळगाव जामोद – गणेश हिरोडकर (८७८८८४२१११), खामगाव – परमेश्वर खोडके (९३५९२९८५४९), मलकापूर – सचिन मापारी (९५८८४३९०४४), देऊळगाव राजा – उमेश घुगे (८६६८२७९४८७), संग्रामपूर – वैभव गळकर (८८०६१७६२१५), लोणार – ज्ञानेश्वर खुपसे (८००७७०६२७०), नांदुरा – मंगेश कराळे (८८०६०७५१५५) आणि मोताळा – प्रतीक तांगडे (९०२२८७१७८२) यांच्याशी संपर्क साधता येणार आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विमा संरक्षण महत्त्वाचे : जिल्ह्यात सन २०२६-२७ मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, रब्बी पिकांचे संभाव्य नुकसान आणि त्यातून उद्भवणारे आर्थिक संकट टाळण्यासाठी पीक विमा संरक्षण घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार कार्यालय किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जालना जिल्हा घरगणना मोहिमेत राज्यात अव्वल हाऊस लिस्टिंग ऑपरेशनमध्ये 94.59 टक्के प्रगती

शेतकऱ्यांच्या मदतीत कमतरता पडणार नाही – महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे कळंब तालुक्यातील नरसापूर येथील दुष्काळग्रस्त शेतपिकांची पाहणी

vishwatmaklokswamivarta

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनासाठी कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन 

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

एमएचटी-सीईटी 2026 परीक्षा केंद्रांच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

राज्य दहशतवाद विरोधी पथकाची यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यात २१ ठिकाणी शोधमोहिम, काहीजण चौकशीसाठी ताब्यात.