vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पंढरपूर-विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा-दुष्काळी परिस्थितीत कीर्तन-प्रवचनातून शेतकऱ्यांना आधार द्या; आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराज मंडळींना आवाहन

📍पंढरपूर-विठ्ठलाच्या महापूजेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संतपूजा-दुष्काळी परिस्थितीत कीर्तन-प्रवचनातून शेतकऱ्यांना आधार द्या; आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून परावृत्त करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महाराज मंडळींना आवाहन

पंढरपूर : प्रतिनिधी- कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरातील वारकरी संप्रदायातील विविध महाराज मंडळींची संतपूजा केली.

पंढरपुरातील धुंडा महाराज देगलूरकर मठ येथे हा संतपूजेचा कार्यक्रम पार पडला.यावेळी विविध महाराज मंडळींचा सन्मान करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. तसेच मासिक आनंदवारी या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी संकटात आहे. अशा कठीण काळात कीर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याचे काम संत-महंत आणि महाराज मंडळींनी करावे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी समाजप्रबोधनातून त्यांच्यामध्ये सकारात्मक विचार निर्माण करण्याची गरज आहे.

वारकरी संप्रदायाला समाजप्रबोधनाची मोठी परंपरा लाभली आहे. कीर्तन आणि प्रवचनातून शेतकऱ्यांना संकटाचा सामना करण्याचे बळ मिळू शकते. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, बळीराजा या संकटातून लवकर बाहेर पडेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेतकरी बांधवांना धीर देण्याचे आणि त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य वारकरी संप्रदायाने करावे, अशी विनंतीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी महाराज मंडळींना केली.

 

#कार्तिकीयात्रा२०२६

#शासकीयमहापूजा

#कार्तिकी_एकादशी

 

संबंधित पोस्ट

आरोग्य शिक्षणासाठी प्रभावी माहिती, शिक्षण व संवाद यंत्रणा अधिक सक्षम करा– आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

राज्यातील महिला व बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचावी या उद्देशाने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मंत्रालयात एकात्मिक बाल विकास सेवा (#आयसीडीएस) योजनेच्या माहिती पुस्तिकेचे अनावरण

उपवर्गीकरण विरोधी संघर्ष मोर्चात २१ जुलै समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे मिलिंद बोर्ड यांचे आवाहन

लातूर जिल्ह्यातील युवक-युवतींनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

डिजिटल जीवन प्रमाणपत्र अभियान-पेन्शनधारकांना घरपोच मिळणार सेवा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई #मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त एन.जी. आचार्य उद्यान – डायमंड गार्डन ते मंडाले या मार्गाचे लोकार्पण तसेच पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन करण्यात आले.

vishwatmaklokswamivarta