vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी परीक्षा*जिल्ह्यातील १५,४१२ विद्यार्थी देणार परीक्षा

नवोदय विद्यालय प्रवेशासाठी शनिवारी परीक्षा*जिल्ह्यातील १५,४१२ विद्यार्थी देणार परीक्षा

अमरावती, द प्रतिनिधी जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत शैक्षणिक सत्र २०२७-२८ मधील इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ‘जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी’ शनिवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता घेण्यात येणार आहेजिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यांमधील ६१ केंद्रावर तब्बल १५ हजार ४१२ विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेची प्रवेशपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्रावरील सर्व तपशील काळजीपूर्वक तपासावेत, परीक्षेचे स्वरूप व सूचना समजून घ्याव्यात आणि परीक्षेच्या दिवशी निर्धारित वेळेपूर्वी केंद्रावर उपस्थित राहावे.

प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र किंवा परीक्षेसंदर्भात इतर कोणतीही अडचण असल्यास जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी (अमरावती) येथील प्रवेश परीक्षा प्रभारी श्री. सोनटक्के यांच्याशी ९४२३६१७८४९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. जे. गवई यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महसूल लोक अदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने निकाली काढा  –जिल्हाधिकारी किशन जावळे,महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

दुष्काळामुळे खचून जावू नका ; संकट काळात शासन बळीराजाच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नांदेड जिल्ह्यातील वाडी बु. येथील शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांचे उमेदवार स्नेहा सिद्धार्थ कसारे यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन धुवाधार प्रचार सुरू विरोधकांची हवा उडाली…

vishwatmaklokswamivarta

प्रहारची ‘धार’ अन् प्रशासनाची झाली ‘हार’!धाड येथील आठवडी बाजारासाठी महामार्गावरच थाटली दुकाने; भरचौकात ठोकला उपोषण मंडप

आताची मोठी बातमी -तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती

पाणी टंचाई निवारणार्थ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावासाठी टँकर मंजूर