vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

महिला आरोग्य सुविधांचा दर्जा, स्वच्छता आणि रुग्णसेवेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले समाधान-जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी; गरोदर मातांच्या आरोग्यसेवेचा घेतला आढावा-बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश; महिलांना सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन

महिला आरोग्य सुविधांचा दर्जा, स्वच्छता आणि रुग्णसेवेबाबत राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी व्यक्त केले समाधान-जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी; गरोदर मातांच्या आरोग्यसेवेचा घेतला आढावा-बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश; महिलांना सायबर गुन्ह्यांबाबत सतर्क राहण्याचे आवाहन

आरोग्य प्रतिनिधी – महिलांना शासकीय आरोग्य यंत्रणेमार्फत मिळणाऱ्या आरोग्य सुविधा, प्रसूती सेवा, नवजात बालकांची सुरक्षा तसेच रुग्णालयातील स्वच्छता व अन्य सोयीसुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी जिल्हा रुग्णालय, अहिल्यानगर येथे अभ्यासपूर्ण दौरा केला. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करून आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उपलब्ध सुविधांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.या पाहणीदरम्यान अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधून रुग्णालयातील उपचार, उपलब्ध सुविधा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या सहकार्याची माहिती घेतली. यावेळी मुलीच्या जन्माबाबत व्यक्त केलेला आनंद पाहून त्या भारावून गेल्या. मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत करणाऱ्या कुटुंबीयांचे त्यांनी कौतुक केले.यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,जिल्हा कार्यक्रम महिला बाल कल्याण अधिकारी संजय कदम, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ बाबासाहेब नागरगोजे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुचेता यादव, डॉ सोनल बांगर, डॉ भारती पेचे, डॉ संजय वाघ, डॉ साहेबराव डवरे, डॉ धनंजय खंडागळे, डॉ महामुनी, डॉ राजश्री कटारिया, डॉ रुपाली कुलकर्णी, डॉ प्रवीण बोथे हॉस्पिटल कर्मचारी उपस्थित होते

त्यानंतर त्यांनी गरोदर मातांच्या वॉर्डची पाहणी करून तेथील वैद्यकीय सेवा, स्वच्छता आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. गरोदर मातांच्या आरोग्यविषयक नोंदवह्यांची तपासणी केली असता त्यामध्ये अद्ययावत व व्यवस्थित माहिती नोंदविण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबद्दल त्यांनी संबंधित अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले तसेच रुग्णालयात आवश्यकतेनुसार पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे का, स्वच्छतेची स्थिती कशी आहे आणि रुग्णसेवेसाठी कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी आहे का, याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती घेतली.नवजात बालकांची सुरक्षा, त्यांच्यासाठी राखण्यात येणारी स्वच्छता, गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ यांचाही त्यांनी आढावा घेतला. जननी सुरक्षा योजना, १०२ रुग्णवाहिका सुविधा यांसारख्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, याची माहिती त्यांनी जाणून घेतली. गरोदर मातांची नियमित व योग्य काळजी घेण्याबरोबरच जोखमीच्या गरोदर मातांची विशेष ओळख करून त्यांना आवश्यक त्या सर्व आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध होतील, असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.

बालविवाह रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची गरज,बालविवाहाचे प्रमाण अद्यापही लक्षणीय असल्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. बालविवाहामुळे मुलींच्या आरोग्यावर, शिक्षणावर आणि भवितव्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि संबंधित विभागांनी समन्वयाने प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सन २०३० पर्यंत भारत बालविवाहमुक्त करण्याचा संकल्प असून, सन २०२६ मध्ये बालविवाहाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्याशीही चर्चा केली.सायबर गुन्ह्यांबाबत महिलांनी जागरूक राहावे सध्याच्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांची फसवणूक व बदनामी करण्याची अनेक उदाहरणे समोर येत असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. तंत्रज्ञानाचा गैरवापर करून महिलांना लक्ष्य केले जाणे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे महिलांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना अधिक सतर्क राहावे, अनोळखी लिंक, संदेश आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहारांपासून सावध राहावे, तसेच सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा रुग्णालयातील विविध विभागांच्या पाहणीदरम्यान सर्व प्रकारच्या नोंदवह्यांची तपासणी करून त्यांनी आरोग्य सेवा व सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. रुग्णांना आवश्यक त्या सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांचे आरोग्य, सुरक्षित प्रसूती, नवजात बालकांचे संरक्षण आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अधिक दक्षतेने काम करावे, असेही त्यांनी यावेळी सूचित केले.

0000

संबंधित पोस्ट

टीबीमुक्त रायगडसाठी ‘जोश’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

आरोग्य विभागाची गरुडझेप : २८ बालकांना थॅलेसिमियामुक्त नवजीवन!जागतिक थॅलेसिमिया दिनानिमित्त ‘एचएलए’ तपासणी शिबिर 

ठाणे जिल्ह्यात १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान ‘अरुणोदय सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष अभियान२०४७ पर्यंत सिकलसेल मुक्त भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

vishwatmaklokswamivarta

नगर पंचायत कोरेगाव आणि तालुका कार्यालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम;किशोरवयीन मुलींना एचपीव्ही (HPV) मोफत लस जिल्ह्यातील २१ हजार मुलींना होणार लाभ

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ