vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आढावा बैठक निर्मल भवन येथे पार पडली

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आढावा बैठक निर्मल भवन येथे पार पडली.

राज्य प्रतिनिधी-#सार्वजनिकआरोग्य विभागातील हिवताप विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत, या मागण्यांवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. आरोग्य पर्यवेक्षक पदाची गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेली पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, तसेच विभागातील सर्व संवर्गांचा सुधारित आकृतीबंध आणि पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्यांच्या अडचणींचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी काळात इन-हाऊस टेस्टिंग सुरू करताना प्रयोगशाळांमध्ये जागेची कमतरता आणि आवश्यक तांत्रिक सुविधांचा अभाव यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रयोगशाळांचे बळकटीकरण करणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयांतर्गत ६३ प्रकारच्या विविध चाचण्या करण्यासाठी प्रयोगशाळा तांत्रिक कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने जिल्हानिहाय प्रशिक्षण देण्याबाबत राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी सूचना केली.

या बैठकीस आमदार संजय केनेकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिव डॉ. उर्मिला जोशी, सहसंचालक डॉ. संदीप सांगळे, अवर सचिव अशोक कायंदे, महासंघाचे अध्यक्ष विजय मोहरकर आदी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

हरीसाल आरोग्य केंद्राच्या पथकाकडून मातेला जीवनदान*प्रसूतीनंतरचा गंभीर रक्तस्त्राव रोखण्यात यश…

vishwatmaklokswamivarta

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

तीव्र रक्तक्षयग्रस्त गरोदर मातांच्या उपचारांना गती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मातृ आरोग्याला प्राधान्य..जुलै २०२६ अखेर ९१ टक्के पात्र मातांना आयर्न सुक्रोज/फेरिक कार्बोक्सि माल्टोज इंजेक्शनचे उपचार

गर्भाशय  मुखाच्या कर्करोगावर प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरणाचे कवच- जिल्हाधिकारी अशोक काकडे- आगामी 90 दिवस एचपीव्ही मोफत लसीकरण मोहीम- जिल्ह्‌यात 22 हजारहून अधिक लसीकरणाचे लक्ष्य

वन्यजीव सप्ताहात वन अधिकारी-कर्मचाऱ्यांचे उत्स्फूर्त रक्तदान सेवा संकल्प अभियानांतर्गत जालना येथे रक्तदान शिबिराचे आयोजन