vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्ता निकषात सुधारणा- आदिती तटकरे

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रोत्साहन भत्ता निकषात सुधारणा- आदिती तटकरे

            मुंबई, प्रतिनिधी: अंगणवाडीतील बालकांचे पोषण, आरोग्य आणि शिक्षणासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दरमहा देण्यात येणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात सुधारणा करण्यात आल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

            राज्यात १,१०,६६४ अंगणवाड्या असून १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे गुणात्मक मूल्यमापन करून पात्र ठरणाऱ्याना दरमहा प्रोत्साहन भत्ता दिला जातो. या भत्त्याच्या निकषांमध्ये सर्वसमावेशकता, सुसूत्रता यावी तसेच अधिकाधिक सेविका आणि मदतनीस यासाठी पात्र ठराव्यात, यासाठी निकषांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेतील समितीने घेतला आहे.

  अंगणवाडी केंद्रांसाठी निर्धारित १० निकषांपैकी किमान ७ निकष पूर्ण करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना अनुक्रमे १४००, ७०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तर सर्व १० निकष पूर्ण केल्यास अनुक्रमे २०००, १००० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. ७ ते १० दरम्यान निकष पूर्ततेनुसार भत्ता निश्चित करण्यात आला आहे. हे निकष नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आले आहेत.

       याविषयी बोलताना मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, राज्याच्या शहरी आणि अतीदुर्गम भागातही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहेत. अधिकाधिक सेविका आणि मदतनीस भत्त्यासाठी पात्र ठरून त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी निकषात सुधारणा करण्यात आल्या आहेत.

000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात एनडीआरएफ आणि एसडीआरएफ च्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन   

रक्षाबंधनासाठी भारतीय टपाल विभागाचे ‘वन स्टॉप राखी सोल्युशन’;बुलढाणा विभागातील सर्व टपाल कार्यालयांत विशेष राखी लिफाफे उपलब्ध..

महाराष्ट्रातील मोठी बातमी- उद्याच सुनेत्रा अजित पवार घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, राज्याला मिळणार पहिली महिला उपमुख्यमंत्री पदी..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

एसआयआरच्या पुढील टप्प्यातील प्रक्रिया सुलभ, पारदर्शक व सर्वसमावेशक ठेवा – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम पुढील टप्प्यातील कामांसाठी विभागाची यंत्रणा सज्ज!