vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई पुस्तक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-उद्घाटनानंतर एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची भेट· २९ नोव्हेंबरपर्यंत लाखो विद्यार्थी भेट देतील, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांचा विश्वास..

मुंबई पुस्तक महोत्सवाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद-उद्घाटनानंतर एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची भेट· २९ नोव्हेंबरपर्यंत लाखो विद्यार्थी भेट देतील, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांचा विश्वास..

            मुंबई, प्रतिनिधी : मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ च्या उद्घाटनानंतर आतापर्यंत एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी महोत्सवाला भेट दिली आहे. येत्या २९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सहा दिवसीय महोत्सवाला लाखो विद्यार्थी भेट देतील, असा विश्वास महोत्सवाचे मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी यांनी व्यक्त केला.       मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजित या महोत्सवात २०० प्रकाशक सहभागी झाले असून, ६०० हून अधिक पुस्तकांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. नामवंत लेखकांचाही या महोत्सवात सहभाग आहे. विद्यार्थी, पुस्तकप्रेमी आणि सर्वसामान्य नागरिकांना साहित्यविश्वाशी जोडण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

     महोत्सवात विविध संकल्पनांवर आधारित प्रदर्शने तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. साहित्य, कला आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या महोत्सवात विविध वयोगटांतील वाचकांना पुस्तकांच्या विश्वाचा अनुभव घेता येत आहे.     मुंबई पुस्तक महोत्सवाला २९ नोव्हेंबरपर्यंत भेट देता येणार असून, महोत्सवातील प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य ठेवण्यात आला आहे.

000

 

संबंधित पोस्ट

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पदावरून हटवावं अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली. 

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी; नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार -पालकमंत्री जयकुमार रावल

गणेशोत्सव काळात अन्न व औषध प्रशासनाची विशेष जनजागृती व अंमलबजावणी मोहीम

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

भरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठित विद्यमान परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करून शासनास सुधारणा सुचविणार

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन