vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवासातून जागतिक विचारविश्वापर्यंत डॉ. दीपक करंजीकर यांचा संवाद मुंबई पुस्तक महोत्सवात अमेय रानडे यांनी साधला संवाद; जागतिक राजकारण, अर्थकारणावरही चर्चा

साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवासातून जागतिक विचारविश्वापर्यंत डॉ. दीपक करंजीकर यांचा संवाद,मुंबई पुस्तक महोत्सवात अमेय रानडे यांनी साधला संवाद; जागतिक राजकारण, अर्थकारणावरही चर्चा

मुंबई, प्रतिनिधी : मुंबई पुस्तक महोत्स २०२६ मध्ये ‘साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील प्रवास’ या विषयावर प्रसिद्ध लेखक, वक्ते, विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि अभिनेते डॉ. दीपक करंजीकर यांची मुलाखत आयोजित करण्यात वआली. अमेय रानडे यांनी त्यांच्याशी संवाद साधत त्यांच्या साहित्यिक आणि कलाक्षेत्रातील प्रवासाचा वेध घेतला.या संवादादरम्यान डॉ. करंजीकर यांनी साहित्य, नाट्य, जागतिक राजकारण, आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि जागतिक स्तरावरील घडामोडींविषयी आपले विचार मांडले. जागतिक राजकारण आणि पडद्यामागील घडामोडींचे अभ्यासक म्हणून त्यांनी विविध आंतरराष्ट्रीय विषयांवर चर्चा केली.यावेळी त्यांनी चीनच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘लाल सूत्र’ या आगामी पुस्तकाची माहिती दिली. तसेच पुढील दोन वर्षांत आपली चार ते पाच पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

संवादाच्या समारोपप्रसंगी अमेय रानडे यांनी डॉ. करंजीकर यांच्या कला आणि साहित्य क्षेत्रातील प्रवासाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांचा हा प्रवास पुढील काळातही सुरू राहील, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांच्या नियोजित साहित्यकृती, काव्यलेखन आणि नाट्यकृतींची वाचकांना प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

000

संबंधित पोस्ट

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सुधाकर अडबाले यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अवर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी भेट..

महिला आरक्षण विधेयक ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन

रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या समाधीस्थळी जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून जालना जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली 

vishwatmaklokswamivarta

कॉंग्रेस, मुस्लिम तुष्टीकरणाचं राजकारण पुढे नेत आहे, जनतेनं या तुष्टीकरणाच्या राजकारणा विरोधात एकजूट व्हावं असं केन्द्रीय गृहमंत्री अमित शहा

पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! पंतप्रधान नरेंद्र मोदी

vishwatmaklokswamivarta