vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी* 

*समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी*

                                                        पुणे प्रतिनिधी : समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पुणे विभागात २९ नोव्हेंबर २०२६ रोजी विभागीय स्तरावर जनसुनावणीचे आयोजन पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातील झुंबर सभागृहात करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन सुनावणी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. सुनावणीचे नियोजन जिल्हानिहाय करण्यात आले असून २९ नोव्हेंबर रोजी सातारा जिल्हा सकाळी १० ते ११ या वेळेत, सांगली सकाळी ११.३० ते १२.३०, सोलापूर दुपारी १ ते २, कोल्हापूर दुपारी ३ ते सायंकाळी ४ आणि पुणे जिल्ह्यासाठी सायंकाळी ४.३० ते ५.३० या वेळेत होईल. समितीचे सदस्य हे सुनावणी कामी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

     या जनसुनावणीसाठी नागरिकांनी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित वेळेच्या एक तास आधी समक्ष उपस्थित राहावे.

   या जनसुनावणीत हितसंबंधित गट, संस्था यांचे प्रतिनिधी तसेच नागरिकांनी निर्धारित दिवशी व निर्धारित वेळेत उपस्थित राहून आपली मते मांडावीत, असे आवाहन पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे. ज्या नागरिकांना केवळ ऑनलाईन पद्धतीने मते नोंदवायची आहेत त्यांना महाराष्ट्र शासनाच्या www.ucc.maharashtra.gov.in या समान नागरी कायदा पोर्टल⁠ वर ३७ मुद्यांची माहिती देता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबईत बांधकाम स्थळांवरील डासउत्पत्ती स्थानांवर कार्यवाहीची विशेष मोहीम..

कॅफे शॉप (कॉफी कॅफे/हॉटेल)आस्थापनांना नियमावली जारी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक

मुंबईतील माहीम चौपाटीलगत असलेला ‘सी फूड प्लाझा’ आज सुरू करण्यात आला.

vishwatmaklokswamivarta

कर्णपूरा यात्रोत्सव शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे– जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया..

आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी नमुंमपा शाळा मुख्याध्यापकांची सहविचार कार्यशाळा