vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञान

स्मार्ट डिस्प्ले इकोसिस्टममुळे एआय परिवर्तनाला गती- सॅमसंग इंडियाचे महाव्यवस्थापक सौरभ एन. करवंदे,शासकीय सेवा, सार्वजनिक सुरक्षा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनात सॅमसंगची एकात्मिक तंत्रज्ञान प्रणाली उपयुक्त

स्मार्ट डिस्प्ले इकोसिस्टममुळे एआय परिवर्तनाला गती- सॅमसंग इंडियाचे महाव्यवस्थापक सौरभ एन. करवंदे,शासकीय सेवा, सार्वजनिक सुरक्षा, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या व्यवस्थापनात सॅमसंगची एकात्मिक तंत्रज्ञान प्रणाली उपयुक्त

मुंबई, प्रतिनिधी : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्राला तंत्रज्ञानसक्षम आणि कार्यक्षम बनविण्यासाठी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांची सांगड घालणारी एकात्मिक डिजिटल यंत्रणा आवश्यक आहे. स्मार्ट डिस्प्ले इकोसिस्टमच्या माध्यमातून शासकीय सेवा अधिक सुलभ, सुरक्षित आणि गतिमान करण्याची मोठी क्षमता असल्याचे माहिती सॅमसंग इंडियाचे महाव्यवस्थापक सौरभ एन. करवंदे यांनी दिली.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने (होस्ट पार्टनर) हॉटेल आयटीसी ग्रँड सेंट्रल, परळ येथे आयोजित ‘एआय ट्रान्सफॉर्मेशन कॉन्क्लेव्ह’मध्ये ‘बिल्डिंग एआय-इनेबल्ड महाराष्ट्र थ्रू स्मार्ट डिस्प्ले इकोसिस्टम्स’ या विषयावरील सादरीकरणात ते बोलत होते.यावेळी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
श्री.करवंदे यांनी सांगितले की, विमानतळ, रेल्वे स्थानके, रुग्णालये, शासकीय कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी माहितीचे प्रभावी प्रसारण करण्यासाठी सॅमसंगचे स्मार्ट डिस्प्ले तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. कमांड अँड कंट्रोल सेंटर, डिजिटल माहिती फलक, स्मार्ट क्लासरूम, सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन व्यवस्थापनासाठी विविध आकारांचे डिस्प्ले तसेच त्यासोबत आवश्यक सॉफ्टवेअर सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.
सॅमसंगच्या एकात्मिक तंत्रज्ञान प्रणालीमुळे शासकीय कार्यालयांमधील बैठका अधिक परिणामकारक करणे, चर्चेचे स्वयंचलित सारांश तयार करणे, विविध भाषांमधील संवाद सुलभ करणे आणि संवेदनशील माहितीचे संरक्षण करणे शक्य होते. तसेच ‘सॅमसंग नॉक्स’ सुरक्षा प्रणालीमुळे डिजिटल माहितीची सुरक्षितता राखण्यास मदत होते. शिक्षण क्षेत्रात देशातील ५० हजार वर्गखोल्यांचे डिजिटल परिवर्तन करण्यात कंपनीने योगदान दिले आहे. तसेच पोलीस यंत्रणा, महिला व बालविकास, पंचायत राज, सार्वजनिक उपक्रम आणि रेल्वे व विमानतळांसारख्या वाहतूक व्यवस्थांमध्येही सॅमसंगची तंत्रज्ञान प्रणाली कार्यरत आहे. सार्वजनिक ठिकाणी २४ तास माहिती उपलब्ध करून देणाऱ्या डिजिटल डिस्प्ले प्रणालीचा वापरही वाढत आहे, असे त्यांनी सांगितले.

स्मार्ट, सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत तंत्रज्ञान ही सॅमसंगच्या प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. भारतातील संशोधन व विकास केंद्रे, उत्पादन सुविधा आणि देशभरातील सेवा जाळ्याच्या माध्यमातून सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या डिजिटल परिवर्तनाला सहकार्य करण्याची कंपनीची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्राचे एआय मिशन प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असून, स्मार्ट डिस्प्ले आणि एकात्मिक डिजिटल सोल्यूशन्सच्या माध्यमातून भविष्यातील शासकीय सेवा अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि नागरिकाभिमुख बनविता येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

0000

संबंधित पोस्ट

दिल्ली येथे ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील समृध्दीसाठी आराखड्याची होणार मांडणी

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे डिजिटल पाऊल; मोबाईल ॲपमुळे लाभार्थ्यांना घरबसल्या सेवा उपलब्ध

22 ऑक्टोबरला नवी मुंबई महापालिका मुख्यालयात ई-कचरा विशेष संकलन मोहीम

vishwatmaklokswamivarta

मागील SIR यादीत तपशील शोधा

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या एआय परिषदेत ब्रिजेश सिंह यांनी पत्रकारितेतील एआय वापरावर केले मार्गदर्शन पत्रकारांनी ‘एआय’कडे कौशल्यवृद्धीची संधी म्हणून पहावे- प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, एआयच्या युगातही पत्रकारितेची विश्वासार्हता अधिक महत्त्वाची..

vishwatmaklokswamivarta

टेक-वारी 2.0’ अंतर्गत ‘जनरेटिव्ह एआय’ विषयावर विशेष तांत्रिक सत्र संपन्न